पन्हाळेकाझीत घराला आग; एकाचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 07:05 PM2019-06-08T19:05:32+5:302019-06-08T19:07:31+5:30

तालुक्यातील पन्हाळेकाझी बोरवाडी येथील घराला आग लागून शशिकांत दत्ताराम पेडणेकर यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता ही घटना घडली.

Panhala Kajeet house fire; Death of one | पन्हाळेकाझीत घराला आग; एकाचा होरपळून मृत्यू

पन्हाळेकाझीत घराला आग; एकाचा होरपळून मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देतब्बल दोन तासांनी सुनिता बबन जाधव यांनी ही आग पाहिली. परंतु त्यापूर्वीच शशिकांत होरपळून मृत्यु पावले होते.
दापोली : तालुक्यातील पन्हाळेकाझी बोरवाडी येथील घराला आग लागून शशिकांत दत्ताराम पेडणेकर यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता ही घटना घडली.

शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेच्या वेळी ते एकटेच होते. रात्री ते आपल्या भावाच्या घरी आई वडिलांसोबत झोपले होते. सकाळी ७ वाजता देवपूजा करण्यासाठी ते आपल्या घरी गेले होते. मात्र अचानक घराने पेट घेतला. पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून त्यांनी घरावर प्लास्टिक अंथरले होते. शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्यानंतर ते बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच आगीन घेरले व त्यांचा आगीत जळून मृत्यू झाला. त्यांची पत्नी माहेरी होती. मुलगा कामानिमित्त मुंबईत असतो. त्यांच्या मुलीचा विवाह झाला आहे. त्यामुळे ते घरी एकटे होते. शनिवारी दुपारी ते खेडला जाणार होते. परंतु सकाळीच त्यांचा होरपळून मृत्यु झाला आहे. पोलीस यंत्रणा, तहसीलदार सुरेश खोपकर, संजय गुरव, मंडल अधिकारी दाभोळ एम. एस. पांडे, मंडल अधिकारी वेळवी सुभाष आंजर्लेकर, एस. एम. सुपल, प्रमोद बोरसे, अक्षय महाडिक यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. या घटनेची माहिती पन्हाळेकाझी पोलिस पाटील बाळकृष्ण विठोबा जाधव यांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच बीट अंमलदार अनंत पवार, पोलिस हेड कॉन्स्टेबल मोहन कांबळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुजीत तळवटकर यांनी घटनास्थली येवून पंचनामा केला.

शशिकांत पेडणेकर यांची पत्नी शकुंतला या आजारी असल्याने कुळवंडी खेड येथे माहेरी असतात. शशिकांत लोटे येथे मिस्त्री काम करत होते. बोरवाड़ी येथे त्यांचे जुने घर आहे. पावसापूर्वी घराची तयारी करण्यासाठी ते दोन दिवसांपूर्वी पन्हाळेकाझी गावात आले होते. शशिकांत पेडणेकर यांचे आई-वडील वयोवृद्ध आहेत. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून, कुटुंबाचा पोशिंदा गेल्यामुळे पेडणेकर कुटुंबाला शासनाकडून मद्त मिळावी असी मागणी केली जात आहे. बोरवाड़ीत केवळ तीन घरे आहेत. वाडी गावापासून लांब आहे शशिकांत पेडणेकर यांचे घर थोड्या अंतरावर आहे. आजूबाजूला घरे नसल्याने आग दिसली नाही. मात्र तब्बल दोन तासांनी सुनिता बबन जाधव यांनी ही आग पाहिली. परंतु त्यापूर्वीच शशिकांत होरपळून मृत्यु पावले होते. घराकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने शासकीय यंत्रणा पोहचायला विलंब झाला. पोलिस, महसूल कर्मचारी पायपीट करत घटनास्थळी पोहचले. शववाहिनी घटनास्थळी पोहचु शकली नाही. दत्ताराम पेडणेकर यांचा मोठा मलगा नदीत वाहून जाऊन मृत्यु झाला होता. आता दुसरा मलगा जळून मृत्युमुखी पडल्याने पेडणेकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Panhala Kajeet house fire; Death of one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.