भारत ़अफगाणिस्तान क्रिकेट सामन्यात भारताला निसटता विजय मिळाल्याच्या अतिउत्साहाने आंबव पोंक्षे येथील गणपत जानू घडशी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ...
सुमारे १८ वर्षे जुन्या असलेल्या डॉन रेसिडेन्सी या इमारतीतील रहिवाशांनी सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करण्याची व अभिहस्तांतरणाबाबत अनेकदा मागणी करुनही त्यास टाळाटाळ करुन दुर्लक्ष केल्याप्रकरणी येथील एका बांधकाम व्यावसायिकावर मोफा (महाराष्ट्र ओनरशिप ...
देवरूखहून रत्नागिरीला जाणारी एस. टी. बस एका बाजूला गटारात कलंडल्याची घटना तुळसणी येथे रविवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घडली. ओव्हरटेक करीत असताना भरावामध्ये रूतून कलंडलेली ही बस सुदैवाने झाडावर कलंडल्याने मोठी दुर्घटना टळली. ...
प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचे मागील टायर निखळून अपघात झाल्याची घटना देवरूख-रत्नागिरी मार्गावर वायंगणे - घोडवली घाटात घडली. एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे येथील मोठा अनर्थ टळला. शनिवारी दुपारी १२.४५ च्या सुमाराला ही घटना घडली. ...
आपली आत्मशक्ती ओळखण्याचे साधन म्हणजे योग आहे, योग साधनेतून आपण स्वत:च्या क्षमता ओळखून त्याचा विकास करु या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जागतिक योग दिनानिमित्त रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमात केले. ...
शिक्षकांच्या बदल्यानंतर राजापूर तालुक्यातील ७ शाळा शून्य शिक्षकी झाल्याचे आजच्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत पदाधिकाऱ्यांनीच समोर आणल्याने शिक्षण विभाग तोंडघशी पडला. चिपळूणातील प्राथमिक शाळा चिंचनाका या शाळेतून विद्यार्थी अन्य शाळेत हलविण्याचा ...
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांचे रूपडे बदलण्यात आले आहे. बाह्यरंगांवरून चकाचक दिसणाऱ्या या गाड्यांमधील समस्या मात्र तशाच आहेत. ...
राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीने मागील काही वर्षात अमुलाग्र बदल केले आहेत. एसटीने एक नवीन रुप परिधान केले आहे. या नव्या युगाच्या आधुनिक लालपरीच्या प्रगतीची गाथा सांगणारे ह्यवारी लालपरीचीह्ण हे अनोखे फिरते प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्श ...