Tribute to Ratnagiri by police martyr | पोलीस हुतात्मा दिनी रत्नागिरीत श्रद्धांजली

पोलीस हुतात्मा दिनी रत्नागिरीत श्रद्धांजली

ठळक मुद्देपोलीस हुतात्मा दिनी रत्नागिरीत श्रद्धांजलीरत्नागिरीतील पोलीस मुख्यालयाच्या पोलीस परेड मैदानावर श्रद्धांजली

रत्नागिरी : पोलीस स्मृतीदिनानिमित्त रत्नागिरीतील पोलीस मुख्यालयाच्या पोलीस परेड मैदानावर सोमवारी सकाळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.

लडाखमधील हॉट स्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० शूर शिपायांवर दिनांक २१ आॅक्टोबर १९५९ रोजी चीनच्या सशस्त्र सैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला व सरहद्दीचे रक्षण करताना प्राणार्पण केले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी भारतभर पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळण्यात येतो.

भारतामध्ये दिनांक १ सप्टेंबर २०१८ ते ३१ आॅगस्ट २०१९ या कालावधीत एकूण २९२ पोलीस अधिकारी व जवान यांनी कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य पत्करले व शहीद झाले. त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील २० पोलीस अधिकारी व जवानांनी कर्तव्य बजावत असताना प्राणार्पण केले.

कर्तव्य बजावीत असताना प्राणार्पण केलेल्या देशातील सर्व हुतात्म्यांना दिनांक २१ आॅक्टोबर २०१९ रोजी पोलीस मुख्यालय परेड मैदानावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

या श्रध्दांजली कार्यक्रमाला पोलीस उपअधीक्षक (गृह) अय्युब खान, पोलीस निरीक्षक शिरीष सासने, रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक अनिल लाड, राखीव पोलीस निरीक्षक रामदास पालशेतकर यांचेसह पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Tribute to Ratnagiri by police martyr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.