आपल्या कुटुंबासह गावाकडे जाण्यासाठी निघालेली ही बस रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्याच्या हद्दीतील भोस्ते घाट उतरत होती. एका अवघड वळणार चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस रस्त्याच्या दुभाजकावर आदळून पलटी झाली. ...
कोरोनाचे हे संकट कधी टळेल व कधी एकदा मुलांच्या शाळा सुरू होतील, असे प्रत्येक पालकाला वाटू लागले आहे. परंतु, कोरोनाच्या धास्तीमुळे शाळा लवकर सुरू झाल्या तरी पालक मात्र मुलांना शाळेत पाठविण्यास धजावणार नाहीत, हेही नक्की! ...
पूर्वा आणि प्राप्ती या बहिणींनी राज्य, राष्ट्र आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही योगाचे महत्त्व पोहोचविले आहे. शरीराबरोबरच मनही सुदृढ होण्यात योगाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ...
अरुण आडिवरेकर रत्नागिरी : मुंबईत कामानिमित्त राहिलेल्या चाकरमान्यांची गावकऱ्यांना काळजी लागून राहिली आहे, तर मुंबईकर गावी येत असल्याने मनामध्ये ... ...
मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने तपासणी अहवाल प्राप्त होत आहेत. ...
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्ण मुंबईहून गावी आल्याचा इतिहास आहे. रविवारी आणखीन १४ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांच्या संख्येत आणखीन वाढ झाली आहे. ...
जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मुंबईतून आलेल्या एका ४९ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरु होता. तो रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील एका गावामध्ये १५ दिवसांपूर्वी आला होता़ त्याला गावाच्या जवळच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. ...
गतवर्षी लांबलेला पाऊस, दोन मोठी वादळे, त्यानंतर अनेकदा आलेले वादळी वारे यामुळे मासेमारी खूपच तोट्यात सुरू होती. त्यातच या मासेमारीला लॉकडाऊनचे ग्रहण लागले आणि हंगामातील सर्वात महत्त्वाचा काळ नुकसानातच गेला. आता या ग्रहणातच मासेमारी हंगाम आटोपणार आहे. ...
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करून महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या कोकण रेल्वेने गेल्या २० दिवसात ५१ श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून तब्बल ६८,७५९ कामगारांना देशाच्या विविध भागात पोहोचवले आहे . या वीस दिवसात महाराष्ट्रातून १३ ट्रेन ...
रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी गावातील एका ९ महिन्याच्या गरोदर महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. खबरदारीचा म्हणून त्या महिलेला रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड रुग्णालयात तिच्यावर उपचार करून तिची सुख ...