शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाचे भातबियाणे शिल्लक

By admin | Updated: July 2, 2015 00:28 IST

अनुदान रद्द : शेतकऱ्यांनी फिरवली खरेदीकडे पाठ

शिवाजी गोरे -दापोली -कोकणातील भातशेती परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाताचे पीक घेणे बंद केले आहे. अनेक शेतकरी भातपीक घेण्याच्या मनस्थितीत नाहीत, अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाकडून ७५ टक्के सबसिडी दिली जात होती. शेतकरी दरवर्षी कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या भाताच्या बियाण्याची पेरणी करुन अधिक उत्पन्न घेत होता. परंतु यावर्षी सरकारने भात बियाण्यावरील अनुदान बंद केल्याने विद्यापीठाच्या बियाण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून, चारही जिल्ह्यातील विक्री केंद्रात आज अखेर बियाणे शिल्लक आहे.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी संशोधन करून निर्माण केलेल्या बियाण्यांमुळे व आधुनिक तंत्रज्ञानामुळे भातशेतीला चांगले दिवस येवू लागले होते. पारंपरिक बियाण्यांची पेरणी करून पीक घेणे बंद करुन शेतकरी विद्यापीठचे सुधारित बियाणं पेरून उत्पादन घेऊ लागला होता. भात बियाणं महाग असलं तरीही भातशेती करणाऱ्या शेतकऱ्याला सरकारनंच मदतीचा हात दिला होता. त्यामुळे चांगल्या जातीचं महागड बियाणंसुद्धा शेतकरी खरेदी करत होता. सरकारी अनुदानामुळे कृषी विद्यापीठ भात बियाणं सहज उपलब्ध करून देत होतं. परंतु अनुदान बंद झाल्यामुळे सधन शेतकऱ्यांनी भात बियाणे रोखीत खरेदी केलं. परंतु गरीब शेतकऱ्याला महागडं बियाणं खरेदी करण्याची ऐपत नसल्याने त्यांनी नवीन बियाण्याकडे पाठ फिरवली आहे. सुमारे ६० टक्के शेतकऱ्यानी जुनेच बियाणं आपल्या शेतीत पेरल्यामुळे त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे. भात पिकाच्या उत्पन्नात घट होऊ शकते, असा दावा आता तज्ज्ञ मंडळी करु लागली आहेत.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महाबीज कंपनीकडून ५ हजार क्विंटल भात बियाण्याची उचल केली. कृषी विद्यापीठाच्या बियाण्याला दरवर्षी शेतकऱ्याचा असलेला प्रतिसाद पाहून यावर्षी अधिकच बियाणे महाबीजकडून मागवण्यात आले. परंतु सरकारने अनुदान बंद केल्यामुळे कृषी विभाग व शेतकऱ्याकडून बियाण्यांची उचल कमी झाली.पेरणी होऊन रोपे लावणीला आली आहेत. तरीसुद्धा दरवर्षी मे महिन्यात संपणारे भात बियाणे विद्यापीठाच्या विक्री केंद्रात पडून आहे. कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ७ बियाणे केंद्रात शेकडो क्विंटल बियाणे शिल्लक आहे. त्यामुळे एवढ्या बियाण्याचं करावं काय? असा प्रश्न विद्यापीठासमोर उभा आहे.उत्पन्नावर परिणाम होणार?सरकारने भातपीक घेणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी अनुदान सुरु ठेवायला हवे होते. परंतु अनुदान बंद करुन कोकणातील शेतकऱ्यावर हा अन्याय आहे. यामुळे शेतकऱ्याने गेल्या वर्षीच्या जुन्या बियाण्याची पेरणी केली असून, त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे. त्यामुळे यावर्षी राज्याच्या भात उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. दुसरीकडे कृषी विद्यापीठाकडे तयार असलेले बियाणे शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे.