शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

हर्णै येथील बेवारस बोटीचा मालक अखेर सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 3:47 PM

Harnai port Ratnagiri- दापोली तालुक्यातील हर्णै समुद्रकिनारी संशयास्पद आढळलेल्या त्या बोटीच्या मालकाचा शोध लागला असून, ती बोट मुरुड येथील मासूम एनरकर यांच्या मालकीची असल्याचे हर्णै पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या बोटीबाबत करण्यात आलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

ठळक मुद्देहर्णै येथील बेवारस बोटीचा मालक अखेर सापडलाही बोट संशयास्पद नसल्याचेही पोलिसांनी सांगितले

दापोली : तालुक्यातील हर्णै समुद्रकिनारी संशयास्पद आढळलेल्या त्या बोटीच्या मालकाचा शोध लागला असून, ती बोट मुरुड येथील मासूम एनरकर यांच्या मालकीची असल्याचे हर्णै पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या बोटीबाबत करण्यात आलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.मुरूड येथील मासूम एनरकर यांनी ही फायबर बोट पाच वर्षांपूर्वी समुद्र सफरसाठी आणली होती. दोन वर्षांपूर्वी श्रीवर्धन येथील सिद्धिकी शिरगावकर यांना दिली होती. त्यांनी दुरुस्तीसाठी आंजर्ले खाडीत ही बोट उभी करून ठेवली होती. या बोटीचा दोर तुटल्याने ती हर्णै समुद्रात आली होती. बरेच दिवस ही बोट तेथेच राहिल्याने मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.हर्णै दूरक्षेत्राचे प्रमुख मोहन कांबळे यांच्या टीमने संपूर्ण दिवस आंजर्लेखाडी परिसरात गस्त घातली होती. या बोटीच्या मालकाचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी केलेल्या शोधमोहिमेच्या आधारे त्या बोटीच्या मालकाचा शोध लागला. हर्णै समुद्रकिनारी आढळलेल्या त्या बोटीच्या प्रकरणावर पोलिसांनी पडदा टाकला असून, बोटीतून कोणीही आले नाही. तसेच ही बोट संशयास्पद नसल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :Harnai portहर्णै बंदरRatnagiriरत्नागिरी