Order to the company to repair the collapsed Kankavali | कणकवलीतील कोसळलेले ते बांधकाम करून देण्याचे कंपनीला आदेश

कणकवलीतील कोसळलेले ते बांधकाम करून देण्याचे कंपनीला आदेश

ठळक मुद्देकणकवलीतील कोसळलेले ते बांधकाम करून देण्याचे कंपनीला आदेशरत्नागिरी:- कणकवली शहरातील चौपदरीकरणाचे बांधकाम कोसळल्यानंतर या बांधकामाचा दर्जा काय प्रतीचा आहे हे उघड झाले. दरम्यान कोसळलेला भाग हा दिलीप बिल्डकॉन कंपनीने स्वखर्चाने रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाचा निर्णय

रत्नागिरी : कणकवली शहरातील चौपदरीकरणाचे बांधकाम कोसळल्यानंतर या बांधकामाचा दर्जा काय प्रतीचा आहे हे उघड झाले. दरम्यान कोसळलेला भाग हा दिलीप बिल्डकॉन कंपनीने स्वखर्चाने पुन्हा बांधून देण्याचे आदेश रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता स. गु. शेख यांनी दिले आहेत.


 आदेशात असे म्हटले आहे की, मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ इंदापूर ते झाराप या ३९१.२१ कि. मी. लांबीचे रस्त्याचे चौपदरीकरणाचे कामास केंद्र शासनाकडून तत्वतः मान्यता प्राप्त असून संदर्भादिन लांबी चौपदरीकरणाच्या भाग-१० कळमठ ते झाराप कि.मी.४०६/०३० ते ४५०/१७० (डिझाईन सा. क्र. २३७/६५५ ते २८१/५६०) एकूण लांबी ४३.९०५ कि.मी. ता. कणकवली व कुडाळ मध्ये येत असुन या लांबीमध्ये मे. डी. बी. एल. कळमठ झाराप हायवेज प्रा. लि. या कंपनीकडून चौपदरीकरणाचे काम दि.०९.०२.२०१७ च्या करारनाम्यानुसार प्रगतीत आहे.

मंजुर कामानुसार एकूण ४३.९०५ किमी लांबीपैकी ४०.२९ कि.मी. लांबीचे महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम नियुक्त कंत्राटदार कंपनी यांचेकडून पूर्ण करण्यात आले आहे.

या प्रकल्पाचे कामावर देखरेख करण्यासाठी स्वतंत्र अभियंता म्हणून मे. आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट लि. या कंपनीची (इंडीपेंडंट इंजिनिअर) म्हणुन नेमणुक करण्यात आली असुन प्रकल्पाच्या नकाशाना मंजुरी देणे व त्याबरहुकुम काम करुन घेण्याची पुर्णत: जबाबदारी मे. आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट लि. या कंपनीच्या इंडिपेंडंट इंजिनिअर यांची आहे.

या प्रकल्पातील कुडाळ जि. सिंधुदुर्गमधील शहरी भागातील लांबी व कणकवली शहरातील ४३ गाळे असलेला १२६० मी. लांबीचा फ्लायओव्हर व पोहच मार्ग वगळता उर्वरित ९५ टक्के पुर्ण झालेले आहे. कणकवली गावामध्ये मुंबई बाजूकडील ४२९ मी. व गोवा बाजुकडील २५५ मी. पोहच मार्गाचे काम व फ्लायओव्हरचे १५ गाळ्यांचे काम मार्च २०२० अखेर प्रगतीत असताना कोवीड- १९ मुळे पुढील काम करता आले नाही.

अपूर्ण राहीलेल्या पोहच मार्गाच्या भरावामध्ये पावसाळ्यात पाणी जावून भरावाच्या दाबामुळे पोहच मार्गाच्या संरक्षक भिंतीचा ४.५० ७ २.०० मी. आकाराचा भाग दि.१३.०७.२०२० रोजी दु. २.०० वाजता पडला आहे. सदर पोहच मार्गाचे काम पूर्णतः काढून नव्याने बांधकाम करणेबाबत कंत्राटदाराच्या खर्चाने करणेबाबत लेखी सुचना देण्यात आलेल्या आहेत व इंडीपेंडंट इंजिनिअर यांनाही सुचित करण्यात आलेले आहे.

या प्रकल्पाच्या बांधकामाची जबाबदारी प्रकल्पा दरम्याने व पुढील १५ वर्षे पूर्णत: कंत्राटदार मे. डी. बी. एल. कळमठ झाराप हायवेज प्रा. लि. यांची असुन त्यावरील देखरेखीची जबाबदारी इंडीपेंडंट इंजिनिअर मे. आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट लि. यांची आहे. असे रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता स. गु. शेख यांनी दिले आहेत.

Web Title: Order to the company to repair the collapsed Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.