ग्रामपंचायती जोडणार आॅप्टीकल फायबर केबलने

By Admin | Updated: October 2, 2014 00:19 IST2014-10-01T22:31:20+5:302014-10-02T00:19:29+5:30

सुहास कांबळे : बीएस्एन्एल्चा २२.८ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

Optical fiber cable connects Gram Panchayat | ग्रामपंचायती जोडणार आॅप्टीकल फायबर केबलने

ग्रामपंचायती जोडणार आॅप्टीकल फायबर केबलने

रत्नागिरी : जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३८६ ग्रामपंचायती लवकरच फायबर आॅप्टिकल नेटवर्कने जोडल्या जाणार आहेत. हा (ठऋडठ) प्रकल्प २२.८ कोटी रूपयांचा असल्याची माहिती भारतीय दूरसंचार निगम (बीएसएनएल)चे महाप्रबंधक सुहास कांबळे यांनी आज पत्रकारांना दिली. आज बीएसएनएलचा १४वा वर्धापन दिन असल्याने कांबळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कंपनीची १४ वर्षांची वाटचाल विशद करून नव्या योजनांसंबधी माहिती दिली.
२००० साली निर्मिती झालेल्या बीएसएनएनएलने गेल्या १४ वर्षात ग्रामीण भागात आपली सेवा पोहोचवली आहे. आज प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बीएसएनएलचे उपविभागीय कार्यालय आहे. जिल्ह्यात १७१ टेलिफोन एक्स्जेंच असून, तर एकूण १९४ मोबाईल टॉवर्स आहेत. यापैकी ६३ टेलिफोन सुविधेसाठी कार्यरत आहेत, तर ५१ टॉवर्स मोबाईल्स आणि इतर अत्याधुनिक (सीडीएमए) वायरलेस अत्याधुनिक सेवांसाठी कार्यरत आहेत. जिल्ह्यात ६ मोठी एक्स्चेंज असून, त्यातील एक रत्नागिरीत आहे, तर उर्वरित सहा इतर ठिकाणी आहेत. शहरी भागात ४१, तर ग्रामीण भागात १२४ ठिकाणीही ही सुविधा उपलब्ध आहे. महाराष्ट्रात ५ ठिकाणी सॅटेलाईट सेवा सुरू असल्याने माळीणसारख्या दुर्घटनेवेळीही बीएसएनएल सेवा अवघ्या चार तासात तिथपर्यंत पोहोचू शकली, असे कांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
नॅशनल फायबर आॅप्टिकल नेटवर्क (ठऋडठ) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर, खेड आणि मंडणगड या चार तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबर नेटवर्कने जोडल्या जाणार आहेत. यासाठी निविदा मागविण्याची प्रकिया सुरू असून, मार्चअखेर हा प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत, असेही कांबळे यांनी सांगितले.
खासगी कंपन्यांनी भाडेतत्त्वावर घेतलेले टॉवर अटी पूर्ण न केल्याने पडून आहेत. ते टॉवर घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून ग्राहकांना अधिकाधिक सेवा देण्याचा बीएसएनएलचा प्रयत्न आहे. सध्या बीएसएनएलच्या हकछछ, छअठऊछकठए, इफडअऊइअठऊ, कळउ, ऊअळअ, टडइकछए, छएअरएऊ छकठए, करऊठ आदी सेवा सुरू आहेत. कमी भाडे, तांत्रिक समस्येचे निवारण, जलद ब्रॉडबँड सेवा, सिंगल विंडो सर्व्हिस, प्रवासात कुठेही वापरावी, अशा सेवा असल्यानेच देशात बीएसएनएल सर्व कंपन्यांपेक्षा अग्रेसर असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
यावेळी उपमंडल अभियंता पी. आर. पारोलकर यांनीही नव्या योजनांविषयी माहिती दिली. सध्या रत्नागिरी शहरापुरता ‘मागेल त्याला कनेक्शन’ हा प्रकल्प राबविला जात असून, त्यानंतर जिल्हाभर राबविला जाईल. हाही प्रकल्प मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. ‘एक खिडकी’ या सर्व सुविधा एकाच छत्राखाली ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची सुविधा सध्या रत्नागिरी शहरात सुरू झाली आहे. यानंतर आता गुहागरात ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
२००६ सालापासून अपुऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांमुळे बीएसएनएल कंपनीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. अजूनही ५० टक्के कर्मचारीवर्ग कमी आहे. त्यांच्या सहाय्याने ग्राहकांना अधिकाधिक सुविधा दिली जात असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी मंडल अभियंता एन. डी. राखेलकर, ए. व्ही. ठाकूर, सहायक महाप्रबंधक अश्विनी लेले, उपमंडल अभियंता पी. आर. पारोलकर, डी. एन. नाटेकर, अंजली गुणे, संदेश खटावकर, योगेश भोंगले, आर. जे. सावंत, कनिष्ठ अभियंता नंदकिशोर कदम, मुख्य लेखाधिकारी पी. जी कांबळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

‘गो ग्रीन’ योजना
ग्राहकांनी त्यांचा मोबाईल नंबर तसेच मेल आयडी दिल्यास बिलाची माहिती त्यांना कळवली जाईल. आॅनलाईन बिल भरल्यास त्यांना बिलात एक टक्का सूट मिळणार आहे. बीएसएनएलतर्फे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक ३३०० शाळा इंटरनेट सेवेने जोडल्या जाणार आहेत. असेही महाप्रबंधक सुहास कांबळे यांनी याप्रसंगी केले.

जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरने जोडल्या जाणार आहेत. त्यांची संख्या तालुकानिहाय

जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरने जोडल्या जाणार आहेत. त्यांची संख्या तालुकानिहाय

Web Title: Optical fiber cable connects Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.