चिपळूण बसस्थानकाचा आता हायटेक सांगडाच शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 03:08 PM2020-09-24T15:08:27+5:302020-09-24T15:09:14+5:30

गेल्या काही महिन्यांपासून येथील हायटेक बसस्थानकाचे बांधकाम रखडले आहे. या कामाला अद्याप गती आलेली नाही. याविषयी एस. टी. महामंडळाकडूनही डोळेझाक केली जात आहे. अर्धवट स्थितीतील या बांधकामाच्या ठिकाणी आता झाडेझुडपे उगवू लागली आहेत.

The only thing left of the Chiplun bus stand is the high-tech Sangda | चिपळूण बसस्थानकाचा आता हायटेक सांगडाच शिल्लक

चिपळूण बसस्थानकाचा आता हायटेक सांगडाच शिल्लक

Next
ठळक मुद्देचिपळूण बसस्थानकाचा आता हायटेक सांगडाच शिल्लकएस. टी. महामंडळाकडून डोळेझाक

चिपळूण : गेल्या काही महिन्यांपासून येथील हायटेक बसस्थानकाचे बांधकाम रखडले आहे. या कामाला अद्याप गती आलेली नाही. याविषयी एस. टी. महामंडळाकडूनही डोळेझाक केली जात आहे. अर्धवट स्थितीतील या बांधकामाच्या ठिकाणी आता झाडेझुडपे उगवू लागली आहेत.

येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या जुन्या इमारतीच्या जागी सोयी - सुविधांनी युक्त व बंदिस्त स्वरूपाचे हायटेक बसस्थानक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. दोन वर्षांपासून या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून, अर्ध्यावरच रखडले आहे. सुरुवातीपासूनच बसस्थानकाच्या कामाचे तीनतेरा वाजले आहेत. अनेक महिने होऊनही या इमारतीचा पायाही पूर्णत्त्वास गेलेला नाही.

कोट्यवधी रुपये खर्च करुन हे बसस्थानक उभे केले जात असताना याकडे खुद्द एस. टी. महामंडळानेच डोळेझाक केली आहे. सध्याच्या अपुऱ्या जागेत अवाढव्य बसस्थानकाचा कारभार चालवणे अशक्य झाले आहे. बऱ्याचदा अधिकारीही आपल्या मर्जीप्रमाणे आढावा बैठकीत कारणे सांगून वेळ मारून नेत आहेत.

लॉकडाऊनच्या कालावधीत काही दिवस बसस्थानकाचे बांधकाम ठेकेदाराने सुरु केले होते. मात्र, त्यानंतर बंद केलेले हे बांधकाम अद्याप सुरु झालेले नाही. त्यामुळे या बांधकामासाठी वापरलेल्या लोखंडी साहित्याने गंज पकडला आहे. तसेच पिलर उभा करण्यासाठी खोदाई केलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून त्याला तलावाचे स्वरूप आले आहे.

Web Title: The only thing left of the Chiplun bus stand is the high-tech Sangda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.