ज्ञानदीप महाविद्यालयात ऑनलाईन वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST2021-09-10T04:38:54+5:302021-09-10T04:38:54+5:30
खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मोरवंडे - बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालयात एकदिवसीय नॅशनल ऑनलाईन वेबिनार संपन्न झाले. ...

ज्ञानदीप महाविद्यालयात ऑनलाईन वेबिनार
खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मोरवंडे - बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालयात एकदिवसीय नॅशनल ऑनलाईन वेबिनार संपन्न झाले.
प्रा. वैशाली राणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. उमेशकुमार बागल यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून नंदुरबारच्या एन. टी. व्ही. एस. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. डी. चौधरी व सावंतवाडीच्या एस. पी. के. विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य अश्विनी लेले ऑनलाईन उपस्थित होत्या.
संस्थेचे सरचिटणीस प्रकाश गुजराथी यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. अश्विनी लेले व डॉ चौधरी यांनी बौद्धिक संपदा हक्क यावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या व्याख्यानानंतर प्रा. इख्तिसाम वावघरकर यांनी विद्यार्थ्यांच्या शंका संकलित केल्या व डॉ. चौधरी यांनी त्यांचे निरसन केले. आभारप्रदर्शन धनश्री आंग्रे यांनी केले. वेबिनारमध्ये सहभागी झालेल्यांना ई-मेलद्वारे प्रमाणपत्र पाठवण्यात आले.