शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणमध्ये सरकारी नोकरीच्या आमिषाने एकास २४ लाखांचा गंडा, रायगडातील एकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:32 IST

चिपळूण : ‘सरकारी नोकरी लावतो,’ असे आमिष दाखवून तब्बल आठ जणांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार खेर्डी (ता. चिपळूण) ...

चिपळूण : ‘सरकारी नोकरी लावतो,’ असे आमिष दाखवून तब्बल आठ जणांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार खेर्डी (ता. चिपळूण) परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस स्थानकात महेश भास्कर म्हात्रे (रा. जिते, पेण, जि. रायगड) येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने डिसेंबर २०२२ ते मे २०२४ या कालावधीत २४ लाख २५ हजारांचा गंडा घातल्याचे समाेर आले आहे.या फसवणूकप्रकरणी नितीन श्रीकांत रसाळ (वय ४०, रा. बुरंबाड, वरचा वठार, शेवरवाडी, ता. संगमेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा शेतीचा व्यवसाय असून, महेश म्हात्रे याने स्वत:ची ओळख प्रभावशाली व्यक्ती म्हणून करून देत ‘सरकारी खात्यात नोकरी लावून देतो,’ असे नितीन रसाळ यांना सांगितले. या आमिषाने रसाळ यांच्याकडून आरोपीने ६ लाख रुपये घेतले. इतकेच नाही, तर त्याने अन्य सात जणांनाही नाेकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एकूण १८ लाख २५ हजार रुपये घेतले.मात्र, कोणालाही सरकारी नोकरी लावली नाही. तसेच घेतलेली २४ लाख २५ हजारांची रक्कमही त्याने परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नितीन रसाळ यांनी चिपळूण पाेलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार ७ जानेवारी २०२६ राेजी महेश म्हात्रे याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ४२०, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बँकांचीही फसवणूकमहेश म्हात्रे याने जनता सहकारी बँक, शाखा चिपळूण व एचडीएफसी बँक, शाखा चिपळूण येथून कर्ज घेतले आहे. या कर्जाच्या आधारे त्याने चारचाकी, दुचाकी तसेच दोन मोबाइल फोन खरेदी केले आहेत. मात्र, त्याने या कर्जाचे हप्ते मे २०२४पासून भरलेले नसल्याचे पुढे आले आहे. तब्बल १६ लाख ६० हजार ५८४ रुपयांची कर्ज रक्कम थकीत असून, बँकांचीही आर्थिक फसवणूक केल्याचे पुढे आले आहे.

फोन केल्यास धमकीनितीन रसाळ यांनी आपण दिलेले पैसे परत मागितले असता आरोपीने फोनवरून शिवीगाळ करत ‘तुझी वाट लावीन, तुझी बदनामी करीन’, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

तब्बल ४०.८५ लाखांची फसवणूकमहेश म्हात्रे याने नाेकरीच्या आमिषाने २४ लाख २५ हजारांची फसवणूक केली आहे. तसेच बँकांची १६ लाख ६० हजार ५८४ रुपये अशी एकूण ४० लाख ८५ हजार ५८४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chipoon: Man duped of ₹24 Lakh with job promise.

Web Summary : A Raigad resident is booked for defrauding eight people of ₹24.25 lakh with false job promises in Chiplun. The accused also defrauded banks of ₹16.60 lakh through unpaid loans and threatened the complainant.