आवाशी : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील डॉ. खान कंपनीत झालेल्या स्फोटातील जखमी कामगारांपैकी एका कामगाराचा मंगळवारी पहाटे सहा वाजता रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे उर्वरित जखमींच्या प्रकृतीविषयी त्यांच्या नातेवाईकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या डॉ. खान केमिकल या कंपनीत दि. ६ मार्च रोजी भीषण स्फोट झाला. त्यात एकूण ११ कामगार जखमी झाले. त्यातील सहा गंभीर जखमी कामगारांवर ऐरोली नवी मुंबई येथील नॅशनल बर्न हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते.
त्यापैकी ६५ टक्क्यांपेक्षा जास्त भाजलेल्या रघुनाथ खंडू खामकर (५७, रा. मुरडे ता. खेड) या कामगाराचा मंगळवारी पहाटे सहा वाजता मृत्यू झाल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. मात्र, उर्वरित कामगारांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचेही त्यांचेकडून सांगण्यात आले.
स्फाेटाचे कारण अजून अज्ञात?कंपनीत झालेल्या स्फोटाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असून, पुणे येथील ऑडिट केलेल्या संस्थेकडूनही अद्याप निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. त्यांनी केलेल्या स्फोटानंतरच्या तपासणीचा अहवाल पुढील दोन दिवसांत येणार असून, त्याचवेळी नेमके कारण समोर येईल, असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर कंपनी सुरक्षा निरीक्षक, कोल्हापूर हेही बुधवारी पुन्हा तपासणीसाठी येणार असल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे.
Web Summary : A worker died from injuries sustained in the Dr. Khan company blast at Ratnagiri's Lote Parshuram industrial area. The cause of the explosion remains unknown, pending investigation reports. Several other workers were injured in the March 6th incident and are receiving treatment.
Web Summary : रत्नागिरी के लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्र में डॉ. खान कंपनी में हुए विस्फोट में घायल एक कर्मचारी की मौत हो गई। विस्फोट का कारण अभी भी अज्ञात है, जांच रिपोर्ट का इंतजार है। 6 मार्च की घटना में कई अन्य कर्मचारी घायल हुए थे और उनका इलाज चल रहा है।