शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत बस-कारची समोरासमोर धडक; अपघातात तरुण ठार, चौघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 15:21 IST

रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे बस आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर कारमधील अन्य चाैघे ...

रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे बस आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर कारमधील अन्य चाैघे किरकोळ जखमी झाले आहेत. विकास कोंडिबा नवसरे (३४, रा. ठाणे, मुंबई), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, हा अपघात गुरुवारी सकाळी झाला.या अपघात कारमधील रविकुमार नागारम (४४), नमन अगरवाल, किशोर तांदळे, सागर भादवे हे चाैघे किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत बसचालक रविकांत नानासाहेब मिसाळ (३७, मूळ रा. बीड, सध्या रा. खेडशी, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ते बस (एमएच १४ बीटी २४८१) घेऊन रत्नागिरी ते जयगड असे जात होते. ते कारवांचीवाडी फाट्याच्या पुढे एका ढाब्याच्या समोर आले असता रत्नागिरीकडे येणाऱ्या कार (एमएच ०४ एलएच १६७८)ने बसला समोरून जोराची धडक दिली.या अपघातात विकास नवसरे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवून अपघाताचा पंचनामा केला. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस स्थानकात करण्याची कार्यवाही सुरू होती.

बैठकीसाठी येताना अपघातअपघातग्रस्त कार ही एका मायक्राे फायनान्स कंपनीची असल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्वजण मुंबईतून रत्नागिरीत एका बैठकीसाठी येत हाेते, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, रस्त्यावरील डायव्हर्जनचा अंदाज न आल्याने गाडी बसवर जाऊन आदळली आणि अपघात झाला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू