बंदुकीची गोळी लागून एकजण जखमी, शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 13:44 IST2020-06-23T13:42:11+5:302020-06-23T13:44:05+5:30
बंदुकीची सफाई करताना चुकून गोळी सुटून गोळीतील छररे थेट कंबर आणि खांद्यात घुसून एकजण जखमी झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे घडली. यातील जखमी संतोष नारायण लोंढे (३६, रा. तिवंडेवाडी, शिरगाव) यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने घडली.

बंदुकीची गोळी लागून एकजण जखमी, शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील घटना
रत्नागिरी : बंदुकीची सफाई करताना चुकून गोळी सुटून गोळीतील छररे थेट कंबर आणि खांद्यात घुसून एकजण जखमी झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे घडली. यातील जखमी संतोष नारायण लोंढे (३६, रा. तिवंडेवाडी, शिरगाव) यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने घडली.
तिवंडेवाडी येथील बंदुकीचा मालक सोमवारी रात्री बंदुकीत बुलेट अडकली म्हणून साफ करण्याचे काम करत होते. तेथेच शेजारी संतोष लोंढे हे उभे होते. बंदूक साफ करीत असताना अचानक बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला आणि त्यातील गोळी समोर भिंतीवर आपटली. त्यानंतर बंदुकीचे दोन तुकडे झाले आणि त्यातील छररे आजूबाजूला उडाले.
त्यातील काही छररे बाजूला उभ्या असणाऱ्या संतोष लोंढे यांच्या कंबरेत आणि खांद्यात घुसले. त्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.