शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: खेडशीतील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, एकाला अटक; मुंबई, सुरत येथील चार मुलींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:03 IST

रत्नागिरी : शहरानजीकच्या खेडशी येथील आकाशवाणी केंद्रासमोरील गौरव लॉजवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रत्नागिरी ग्रामीण पोलिस यांनी संयुक्त ...

रत्नागिरी : शहरानजीकच्या खेडशी येथील आकाशवाणी केंद्रासमोरील गौरव लॉजवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रत्नागिरी ग्रामीण पोलिस यांनी संयुक्त कारवाई करत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाेलिसांनी मुंबई, सुरत येथील ४ मुलींची सुटका केली असून, एकाला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.अरमान करीम खान (रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ कायद्यांतर्गत ताब्यात घेऊन घटना स्थळावरून अटक करण्यात आली. त्याच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाच्या हद्दीत अनैतिक व्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकामार्फत एक डमी गिऱ्हाईक पाठवून खेडशी आकाशवाणी केंद्रासमोर हॉटेल गौरव लॉज येथे छापा टाकण्यात आला.त्या ठिकाणी देह विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी ४ मुलींना आणल्याचे निष्पन्न झाले. पाेलिसांनी अरमान करीम खान याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला १६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस करत आहेत. या गुन्ह्यात अरमान खानच्या अन्य साथीदारांचा तसेच या ठिकाणी येणाऱ्या गिऱ्हाईकांचाही पोलिस शोध घेत आहेत.ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे प्रभारी अधिकारी राजेंद्र यादव व स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस फौजदार सुभाष भागणे, हवालदार नितीन डोमणे, शांताराम झोरे, बाळू पालकर, प्रवीण खांबे, गणेश सावंत, सत्यजित दरेकर, महिला हवालदार वैष्णवी यादव यांनी केली.

‘त्या’ चार मुलींची महिला आश्रमात रवानगीगौरव लॉज येथे वेश्या व्यवसायातून चार मुलींची सुटका करण्यात आली. त्या ४ मुलींची न्यायालयाने एका महिला आश्रमात रवानगी केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस