शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

एकेकाळी टंचाईग्रस्त असलेल्या गावाची जलमित्र पुरस्काराला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 6:03 PM

टंचाईग्रस्त गाव ते शासनाचा जलमित्र पुरस्कार अशी मजल दापोली तालुक्यातील कर्दे गावाने मारली असून कायमची टंचाईमुक्ती मिळवलेल्या या गावाला जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्याहस्ते जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे

दापोली : टंचाईग्रस्त गाव ते शासनाचा जलमित्र पुरस्कार अशी मजल दापोली तालुक्यातील कर्दे गावाने मारली असून कायमची टंचाईमुक्ती मिळवलेल्या या गावाला जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्याहस्ते जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. दापोली तालुक्यातील कर्दे गावाने जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्यावर्षी सन २०१५-२०१६मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या या गावाने केलेल्या उत्कृष्ट कामाची शासनाकडून दखल घेण्यात आली आहे.गावाने केलेल्या कामाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. दुसरीकडे या गावातील जलयुक्त शिवार अभियानामुळे शिवारातील पाणीपातळीत कमालीची वाढ होऊन मोहिमेचे फलित आता गावात जाणवू लागले आहेत.

समुद्रकिनारपट्टीवर असलेल्या कर्दे गावाच्या एका बाजूला अथांग समुद्र तर दुस-या बाजूला प्रचंड डोंगर उतार अशा विचित्र भोगोलिक परिस्थितीत वसलेल्या या गावातील शिवारात पावसाचे पाणी साचून न राहता थेट समुद्र्राला जाऊन मिळत होते. अशा परिस्थितीत गावाला पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवून पाणीटंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत होता. परंतु जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्याचवर्षी या गावाची निवड जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झाली व गावाचे भाग्यच उजाळले.

या मोहिमेअंतर्गत शिवारात तीन सिमेंट बंधारे, मातीचे दोन बंधारे, दगडी बंधारे, सलग समतल चर, गॅबियन बंधारे विविध कामाच्या माध्यमातून पावसाचे पाणी साठविण्यात आले. पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरविण्यात येऊ लागल्याने शिवारातील पाणीसाठ्यात वाढ झाली. पाणी पातळीत झालेल्या वाढीमुळे पिण्याच्या पाण्यातून कायमस्वरूपी सुटका झाली आहे. पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे नारळ, आंबा-काजूच्या बागांना मुबलक पाणी उपलब्ध झाले असून बागायती शेतक-यांना अधिक उत्पन्न मिळायला लागले आहे. गावाच्या पाणीटंचाईबरोबरच शेतकºयांच्या अर्थकारणालाही बळकटी मिळाली आहे .

गावाशेजारी असणा-या डोंगरात सलग समतल चर मारण्यात आल्याने डोंगरातील पाणी त्याचठिकाणी अडविले जाते. डोंगर उत्तरातील पाणी कधीकाळी वाहून जात होते. मात्र आता पावसाचे पाणी अडविण्यात यश आले आहे. दापोली तालुक्यातील कर्दे गावाने उत्कृष्ट काम करून जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार पटकावला आहे. कर्दे गावाने कायमस्वरूपी पाणी टंचाईवर मात करून या समस्येतून सुटका करून घेतली आहे. तालुक्यात अजून काही गावे टंचाई ग्रस्त आहेत. अशा गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात होऊन, तालुकाटंचाई मुक्त व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे.जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्याचवर्षी दापोली तालुक्यातील वनौशीतर्फे पंचनदी या गावाने जिल्हास्तरीय द्वितीय, व कर्दे गावाने उत्कृष्ट काम करून जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक पटकावला आहे. या गावाने मोहिमेत दाखविलेला लोकसहभागसुद्धा तितकाच महत्वाचा आहे. जलयुक्त शिवार अभियान मोहीम शेतक-यांसाठी खूप उपयुक्त असून पुढील काळात दूरगामी फलित या योजनेचे आढळून येतील.मुरलीधर नागदिवे, तालुका कृषी अधिकारी, दापोली

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारGovernmentसरकारRam Shindeप्रा. राम शिंदे