Ratnagiri News: राजापुरात ठाकरे शिवसेनेला दणका, शेकडो शिवसैनिकांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 13:42 IST2023-02-10T13:40:50+5:302023-02-10T13:42:16+5:30
लवकरच आणखी काही काही शिवसैनिकही प्रवेश करणार

Ratnagiri News: राजापुरात ठाकरे शिवसेनेला दणका, शेकडो शिवसैनिकांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश
राजापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने उद्धव ठाकरे शिवसेनेला दणका दिला आहे. शिवसेनेचे अणसुरे उपविभाग प्रमुख राजन कोंडेकर यांच्यासह जैतापूर, मोरोशी व निखरे भागातील शेकडो शिवसैनिकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे राजापूर तालुकाप्रमुख अशफाक हाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्वांनी पक्षप्रवेश केला. हाजू यांनी या सर्वांचे स्वागत केले. यामध्ये राजन कोंडेकर यांच्यासह अनंत कदम, अशोक कानडे, महादेव पड्यार, गोविंद सौंदळकर, बाबू कोरगावकर, प्रवीण नकाशे, चेतन तांबे, सुधीर पोटले आदींसह अनेकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा झेंडा हाती घेतला. लवकरच आणखी काही काही शिवसैनिकही प्रवेश करणार आहेत.
यावेळी भरत लाड, नाना कोरगावकर, प्रशांत गावकर, बाळकृष्ण तानवडे, हातिवले ग्रामपंचायत सदस्या दीपाली शिंदे, सारिका धालवलकर, मिठगवाणे ग्रामपंचायत सदस्या जान्हवी गावकर, जितू गावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.