शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनांसाठी आता लोकवर्गणीची अट रद्द

By admin | Updated: July 29, 2014 23:03 IST

पाणी गुणवत्ता कार्यशाळा : ग्रामीण भागातील पाणी योजनांना उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न

रत्नागिरी : नळपाणी पुरवठा योजनांसाठी लोकवर्गणीसारखा कोणताही आर्थिक भार जनतेवर न लादता ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.पंचायत समितीच्यावतीने जिल्हा परिषदेच्या श्यामराव पेजे सभागृहात आयोजित पाणी गुणवत्ता कार्यक्रम तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, पंचायत समिती सभापती अनुष्का खेडेकर, प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे, गटविकास अधिकारी जे. डी. साखरे, उपसभापती योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये आदी उपस्थित होते. रत्नागिरी एमआयडीसी क्षेत्रातील आठ गावांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बावनदीतील पाणी आणण्यासाठी शासनाने नुकतीच ५७ कोटी रुपयांच्या निधीला त्वरित मान्यता दिली आहे. त्यामुळे जनहिताची विकासकामे करत असताना जात, पात, धर्म, पक्ष विसरुन ग्रामस्थांनी एकत्रित विकासाच्या प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे. जनहिताची कामे करत असताना निकोप स्पर्धेच्या माध्यमातून दर्जेदार कामाचा आग्रह समाजातील प्रत्येक घटकाचा असला पाहिजे. दर्जेदार कामांसाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी योग्य समन्वयाद्वारे कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. तसेच जनहिताचे निर्णय घेऊन दर्जेदार विकासाची कामे करणाऱ्या अधिकारीवर्गालाही प्रोत्साहन दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यशाळेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, अन्य विभागाचे अधिकारी व तज्ज्ञ यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद पाणी पुरवठा व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी कार्यशाळेत भाग घेतला. (शहर वार्ताहर)