शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: राजापुरात नऊवर्षीय बालिकेवर अत्याचार, तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 15:53 IST

राजापूर : एका नऊवर्षीय बालिकेवर तरुणाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार राजापुरात घडला असून, या प्रकाराची माहिती मिळताच पालकांच्या पायाखालची ...

राजापूर : एका नऊवर्षीय बालिकेवर तरुणाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार राजापुरात घडला असून, या प्रकाराची माहिती मिळताच पालकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याप्रकरणी पालकांनी राजापूर पाेलिस स्थानकात फिर्याद दाखल करताच पाेलिसांनी पारस भिकाजी आडिवरेकर (२१, रा. राजापूर) याला अटक केली आहे. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता १ जानेवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पारस याने पीडित नऊवर्षीय मुलीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे पुढे आले आहे. पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने घडलेला प्रकार उघडकीस आला. तिची प्रकृती बिघडल्याने प्रथम सरकारी आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.याप्रकरणी पीडितेच्या नातेवाइकांनी राजापूर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या चौकशीमध्ये संशयित तरुणाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता ६४ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पाेक्सो) नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास राजापूर पोलिस करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस