रत्नागिरी जिल्ह्यासाठी आलेले ऑक्सिजन न उतरवताच परत- नीलेश राणे यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 17:43 IST2020-09-19T17:42:02+5:302020-09-19T17:43:31+5:30
अधिक नफा मिळवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांकरिता आलेला ऑक्सिजन टँकर रायगड गॅसेस कंपनीने मंत्री आणि मुख्य सचिवांचे वजन वापरून ऑक्सिजन न उतरवताच जिल्हाधिकाऱ्यांकडून काढून घेतल्याची टीका भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी आलेले ऑक्सिजन न उतरवताच परत- नीलेश राणे यांचा आरोप
रत्नागिरी : अधिक नफा मिळवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांकरिता आलेला ऑक्सिजन टँकर रायगड गॅसेस कंपनीने मंत्री आणि मुख्य सचिवांचे वजन वापरून ऑक्सिजन न उतरवताच जिल्हाधिकाऱ्यांकडून काढून घेतल्याची टीका भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.
यामुळे राज्य सरकारला आणि जिल्हाप्रशासनाला जनतेच्या जीवाशी सोयरसुतक नसल्याचे उघड झाले असून सरकार कंपन्यांच्या नफ्यासाठी हितसंबंध जोपासत असल्याची टीका भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज ही दिवसाला १५ टन एवढी आहे. मात्र, १० टन ऑक्सिजनची कमतरता आहे. भविष्य काळात वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता ऑक्सिजनची गरज देखील वाढणार आहे. मात्र, सरकारला जनतेचे होत असलेले हाल दिसत नाही आहेत. राज्य सरकारला कंपन्यांचे हित जोपासताना दिसत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.