शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Ratnagiri: लांजात मामीचा खून करून भाच्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:34 IST

लांजा : मामीचा गळा दाबून खून करून स्वत: विषारी औषध प्राशन केल्याची घटना लांजा तालुक्यातील इंदवटी येथे शनिवारी सकाळी ...

लांजा : मामीचा गळा दाबून खून करून स्वत: विषारी औषध प्राशन केल्याची घटना लांजा तालुक्यातील इंदवटी येथे शनिवारी सकाळी उघडकीला आली. राखी पलाश माेंडल (३३, रा. बेलमथपार, पश्चिम बंगाल) असे मृत महिलेचे नाव आहे, तर तिचा भाचा निताई संजय मंडल (३१) याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी बळीराम हरिमाेहन कबीराज (४३, मूळ रा. बगुला, पश्चिम बंगाल, सध्या रा. वैभव वसाहत, लांजा) यांनी दिली आहे. बळीराम कबीराज हे मुकादम असून, त्यांच्याकडे राखी माेंडल व निताई मंडल दोघे काम करीत होती. कबीराज हे कोर्ले येथील रस्त्याचे काम संपवून सर्व कामगारांना घेऊन इंदवटी येथे संरक्षण भिंतीचे काम करण्यासाठी शुक्रवारी गेले होते. त्याच ठिकाणी झोपड्या उभारून कामगार राहत होते. राखी व निताई हे दाेघेही येथेच राहत हाेते.दरम्यान, शनिवारी सकाळी ९ वाजता दोघेही कामाला न आल्याने ठेकेदाराचा मुलगा हरिमोहन कबीराज त्यांना पाहण्यासाठी गेला. त्यावेळी राखी माेंडल या निपचित पडलेल्या दिसल्या. तर निताई हा बाजूलाच तडफडत हाेता. त्याला तातडीने उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून अधिक उपचारासाठी रत्नागिरीत नेण्यात आले.शवविच्छेदनानंतर राखी माेंडल यांचा गळा आवळ्याने मृत्यू झाल्याचे समाेर आले. याप्रकरणी निताई याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांजाचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, हेडकॉन्स्टेबल अरविंद कांबळे, नासीर नावळेकर, प्रियांका कांबळे, दिनेश आखाडे, राजेंद्र कांबळे, चालक नाना डोर्लेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्नराखी माेंडल यांच्या खुनानंतर निताई मंडल याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर रत्नागिरीत उपचार सुरू आहेत. त्याच्यावर उपचार सुरू असल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस