शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

Ratnagiri Politics: दापोली नगरपंचायतीत ठाकरे गटाला मोठा धक्का, सभापती निवडीत अजित पवार गटाची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 12:00 IST

नगराध्यक्ष बदलाच्या हालचाली

दापोली : महाविकास आघाडीची सत्ता असलेल्या येथील नगरपंचायतीच्या सभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना आणि भाजप असे समीकरण जुळून आल्याने ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे.दापोली नगरपंचायतीत शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता होती. मात्र राज्यात बदललेल्या समीकरणांमुळे ठाकरे गटाची साथ सोडत, राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसेना आणि भाजप महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सत्ता समीकरणे बदलल्याने दापोली नगरपंचायतीत सत्तापरिवर्तन होईल, असे सूतोवाच आमदार योगेश कदम व खासदार सुनील तटकरे यांनी केले होते. त्याचा प्रत्यय या निवडणुकीत आला.महाविकास आघाडी सरकारच्या काळात दापोली नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. आघाडी म्हणूनच दोन्ही पक्ष निवडणुकीला सामोरे गेले होते. या निवडणुकीत दापोलीच्या जनतेने महाविकास आघाडीला पसंती दिली होती.शिवसेनेने या निवडणुकीची सूत्रे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे सोपवल्याने आमदार योगेश कदम यांनी आपल्याच पक्षावर नाराज होत स्वतंत्र अपक्ष उमेदवार उभे केले होते. यामध्ये ठाकरे गटाच्या नगरसेविका ममता मोरे नगराध्यक्षपदी, तर राष्ट्रवादीचे खालीद रखांगे उपाध्यक्षपदी विराजमान झाले होते. दोन वर्ष सत्तेत महाविकास आघाडी सत्तेत होती.ठाकरे गटाची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीत सहभागी झाला आहे. त्यामुळे दापोलीतही नवी समीकरणे बघायला मिळणार, अशी चर्चा अनेक दिवस सुरू होती. बुधवारी झालेल्या सभापती निवडणुकीत बांधकाम समिती सभापतिपदी उपनगराध्यक्ष खालीद रखांगे (राष्ट्रवादी अजित पवार गट), पाणीपुरवठा सभापतिपदी संतोष कळकुटके (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), स्वच्छता सभापतिपदी महबूब तळघरकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), महिला बालकल्याण सभापती कृपा घाग (शिवसेना शिंदे गट) यांनी बाजी मारली आहे.आता नगराध्यक्ष बदलविषय समिती निवडणुकीत ठाकरे गटाला धक्का दिल्यानंतर आता नगराध्यक्ष बदलाच्या हालचालीही लवकरच केल्या जाणार असल्याची चर्चा आहे. खासदार सुनील तटकरे आणि योगेश कदम एकत्र आल्यामुळे हे बदल लवकरच होण्याची अपेक्षा केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे