शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

समाजप्रबोधनासाठी ‘नमना’चे माध्यम (संडे स्पेशल)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:29 IST

नमनामध्ये ३० ते ४० लोकांचा सहभाग असतो. नमनामध्ये सहभागी होणाऱ्या मंडळींची एक विशिष्ट वेशभूषा असते. एका विशिष्ट झगेदार पोशाखात ...

नमनामध्ये ३० ते ४० लोकांचा सहभाग असतो. नमनामध्ये सहभागी होणाऱ्या मंडळींची एक विशिष्ट वेशभूषा असते. एका विशिष्ट झगेदार पोशाखात हे कलाकार दोन रांगेत आडवे उभे राहतात. प्रत्येकाच्या हातात टाळ, डोक्यावर रंगीबेरंगी पगडी, गळ्यात रंगीत ओढण्या असतात. रांगेच्या मध्यभागी असलेला सूत्रधार मात्र संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असतो. देवाच्या नावाने नमनाला प्रारंभ होतो. सुरुवातीला बारा किंवा सोळा नमने सादर केली जातात.

बारा नमनांनंतर संकासुर प्रवेश करतो. त्याचा पोशाख दशावतारातील संकासुरासारखा असतो. त्याने उंच काळी टोपी घातलेली असते. तिने त्याचा संपूर्ण चेहरा झाकला जातो. दिसण्याकरिता दोन छिद्रे ठेवलेली असतात. तो मूकपणे नृत्य करीत असतो. कधीकधी त्याच्याबरोबर स्त्री वेशातील पुरुषही नाचत असतो. एक सोंग गेल्यावर दुसरे सोंग येईपर्यंतचा काळ हा संकासुर, मृदुंगवादक यांच्या, गाण्याचा व मृदुंगाच्या तालावर नाचण्याचा असतो. गुहागरच्या पट्ट्यात संकासुर हा प्रकार अधिक आहे.

नमन गाणाऱ्या मंडळीच्या कडेला दोन मृदुंग वाजविणारे असतात. या लोककलेत ‘गणगौळण’प्रमाणेच आणखीही महत्त्वपूर्ण काही सोंगे असतात. सोंगात सर्वप्रथम गणपतीबाप्पांना अग्रक्रम आहे. गणेशाचे पूजन सादर करतानाच गणेशाची आख्यायिका गाण्यातून सादर केली जाते. लाकडापासून बनविलेले मुखवटे सुरुवातीला वापरले जात असत. मात्र, आता त्यामध्ये बदल झाला असून, हलक्या व प्लास्टिक, फायबरपासून बनविलेल्या मुखवट्यांचा वापर वाढला आहे. गणपतीच्या आगमनावेळी काही अन्य सोंगेही सादर केली जातात. त्यामध्ये नटवा, शंखासुर, वाघ, हरिण यांचा समावेश असतो.

गण सादर झाल्यानंतर ‘गवळण’ सादर केली जाते. गवळण हा प्रकार मजेदार व श्रवणीय असतो. दही, दूध, लोणी विक्रीसाठी गवळणी मथुरेच्या बाजाराला निघालेल्या असतात. मात्र, त्यांची वाट गोकुळातील पेंद्या, सुदामा (श्रीकृष्णाचे सवंगडी) रोखतात. त्यावेळी गवळणी, पेंद्या व सुदामा यांच्यातील संवादाबरोबर गाणी व मिश्किल प्रकार सादर केले जातात. कृष्णाचे सवंगडी गवळणींची वाट अडवीत त्यांच्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या मालाची लूट करतात. माठही फोडतात. यावेळी मावशी (ज्येष्ठ महिला) अनेक कला सादर करते, त्यावेळी प्रेक्षकांमधून हास्याचे फवारे उडतात. गवळणी आपल्या गाण्यातून वाट सोडण्यासाठी श्रीकृृष्णाची विनवणी करतात. गवळणीनंतर कौटुंबिक जीवनावर आधारित मात्र एक चांगला संदेश देणारी नाटुकली सादर केली जाते. या नाटुकलीचा विषय सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारा असतो. नमनामध्ये शिपाई हे हल्लीच्या पोलीस दलातील हवालदाराप्रमाणे असतात. गंभीर विषय विनोदी करून सांगताना विविध संदेश देत असतात. एकूणच त्यांच्या अभिनयातून सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो.

नमनाच्या शेवटी वगनाट्य सादर करण्यात येते. उत्तररंगात पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक कथानकाचा समावेश असलेले एखादे आख्यान असते. रामायण-महाभारतातील कथांचा समावेश असतो. एकूणच सूत्रधार गाण्यातून कथाभाग जोडला जातो व कथानक पुढे नेत असतो. देवादिकांची व प्राण्यांची सोंगेही मुखवटे घालून आणली जातात. शेवटी रावणाचे सोंग येते. दहा तोंडांचा मुखवटा घालून रावण प्रेक्षकांतून ढोल-ताशांच्या तालावर नाचत, आरोळ्या ठोकत प्रवेश करतो. राम-रावण युद्ध होते व रावण मारला जातो. रावण वधानंतर खेळ्याचा मुख्य सूत्रधार यजमानाकडून आरती घेतो. खेळे देवाची आरती म्हणतात व रात्रभर चाललेला हा खेळ उजाडता उजाडता समाप्त होतो. कथा सादर होताना त्यातील नाट्य पुरेपूर फुलविण्यासाठी गद्य-पद्यमिश्रित निवेदन शैलीचा वापर केला जातो. वगनाट्यात पौराणिक विषयावरील एखादी कथा किंवा एखादा सद्य:स्थितीचा विचार करून कथेचा भाग सादर करण्यात येतो. परमेश्वराने धारण केलेल्या दहा अवतारांवर आधारित सोंग आणणे, त्यांच्या जीवनावरील काही घटना-प्रसंगांचे खेळातून दर्शन घडविणे, हा या नाटकाचा उद्देश असतो.

राजापूर तालुक्यात कापडखेळे हा प्रकार अधिक दिसतो. त्यालाच काही ठिकाणी टिपरी खेळे असेही म्हणतात. विशिष्ट पद्धतीचे कपडे परिधान करून हातात टिपऱ्या घेऊन पारंपरिक गीते ही मंडळी सादर करतात. राजापूर तालुक्याच्या काही भागात गोमूचा नाचही घरोघरी जाऊन सादर केला जातो. शिधा, आर्थिक मोबदला कलाकारांच्या पदरात पडावा, यासाठीची ही प्राचीन काळापासूनची तरतूूद.

शिमगोत्सवात घरोघरी खेळे सादर होतात. याशिवाय काही गावांतून गोमूचा नाच अथवा संकासुराचा नाच हा देखील कार्यक्रम होत असतो. वास्तविक दोन्ही पात्रे नमनातीलच आहेत. पूर्वीपासून जोपासलेली ही लोककला आजच्या पिढीलाही आवडणारी आहे. लाइव्ह शोच्या जमान्यात पौराणिक विषयावरील कथानकाबरोबर सामाजिक संदेश देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य नमनातून होत आहे. कोरोनामुळे केवळ ५० माणसांच्या उपस्थितीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. शिमगोत्सवात मानाची नमने बाहेर पडतात. कोरोनामुळे ठराविक मंडळी नमनात सहभागी होत असून, मास्कही सक्तीने वापरत आहेत. नमनातूनही मास्क, सॅनिटायझर वापराबरोबर सोशल डिस्टन्सिंग राखण्याचा संदेश देण्यात येत आहे.