शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri News: माणगाव येथील लाकूडतोड्याचा खेडमध्ये खून, एकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 16:42 IST

संशयित आरोपीचा शोध सुरू

खेड : जंगलतोडीसाठी माणगाव येथून खेड येथे आलेल्या लाकूडतोड कामगाराचा त्याच्याच एका सहकाऱ्याने खून केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. ही घटना २६ डिसेंबर २०२२ राेजी घडली असून, या कामगाराचा मृतदेह तब्बल एक महिन्यानंतर आंबवली-वरवली गावच्या दरम्यान असणाऱ्या घनदाट जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळला. मंगेश गायकवाड असे मृत कामगाराचे नाव असून, याप्रकरणी रविवारी (२९ जानेवारी) रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खेड तालुक्यातील आंबवली-वरवली या दोन गावांच्या दरम्यान असणाऱ्या भागात जंगलतोड सुरू होती. यासाठी माणगाव (जि. रायगड) येथून लाकूडतोड करणारे कामगार खासगी जंगलतोड करणाऱ्या कंत्राटदाराने मागवले होते. २६ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे जंगलतोड झाल्यानंतर कामगारांमधील दोघांमध्ये वाद झाला. या वादातून झालेल्या मारहाणीत मंगेश गायकवाड या कामगाराचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह दुर्गम जंगलात टाकण्यात आला होता.दोन दिवसांपूर्वी काही स्थानिक ग्रामस्थांना कुजलेल्या अवस्थेत या कामगाराचा मृतदेह आढळला. याबाबत खेड पोलिसांना माहिती देताच पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच जाऊन शवविच्छेदन केले. हा मृतदेह कोणाचा आहे, या संदर्भात पोलिसांनी चौकशी केली असता काही दिवसांपूर्वी खेड पोलिस स्थानकात बेपत्ता म्हणून नोंद झालेल्या आणि याच परिसरात जंगलतोडीसाठी आलेल्या मंगेश गायकवाड या व्यक्तीचा असल्याचे तपासात पुढे आले.तपासादरम्यान दोन कामगारांमध्ये हाणामारी झाली हाेती. त्यात मंगेश गायकवाड याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या तपासादरम्यान निदर्शनाला आले. त्यानंतर रविवारी खेड पोलिस स्थानकात मंगेश गायकवाड या लाकूडतोड कामगाराला मारहाण करून खून केल्याप्रकरणी एकावर भारतीय दंड विधान कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित खुन्याला पकडण्यासाठी खेड पोलिसांचे पथक रवाना झाले असून, संशयित आरोपीचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस