शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

पैशाच्या हव्यासापोटीच बँक व्यवस्थापकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:21 PM

गुहागर तालुक्यातील वेलदूर येथील विदर्भ ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापक सुनेत्रा सुनील दुर्गुळी (५८) यांचा पैशाच्या हव्यासापोटी वेलदूर नवानगर येथील दोघांनी खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी संजय श्रीधर फुणगूसकर (४०) व सत्यजित बबन पटेकर (३२) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देपैशाच्या हव्यासापोटीच बँक व्यवस्थापकाचा खूनदोघे गुहागर पोलिसांच्या ताब्यात

गुहागर : तालुक्यातील वेलदूर येथील विदर्भ ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापक सुनेत्रा सुनील दुर्गुळी (५८) यांचा पैशाच्या हव्यासापोटी वेलदूर नवानगर येथील दोघांनी खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी संजय श्रीधर फुणगूसकर (४०) व सत्यजित बबन पटेकर (३२) यांना पोलिसांनी अटक केली आहे.गुरुवारी सकाळी नवानगर तरी जेटी येथे एका महिलेचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. याबाबत पोलीस पाटील अरविंद पड्याळ यांनी गुहागर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह बाहेर काढला. ही महिला वेलदूर विदर्भ ग्रामीण शाखेच्या व्यवस्थापक असल्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.

सुनेत्रा दुर्गुळी या सायंकाळपासून बेपत्ता असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. बुधवारी दुपारी त्या बँकेतून बाहेर पडल्यानंतर कोणासोबत कुठे गेल्या, शेवटचा संपर्क कुणाला केला याची माहिती घेतल्यानंतर संजय श्रीधर फुणगूसकर याच्यासोबत वेलदूर ते शृंगारतळी असा प्रवास केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसी खाक्या दाखवताच संजय फुणगूसकर व त्याचा साथीदार सत्यजित बबन पटेकर (३२) यांनी मिळून पैशासाठी खून केल्याचे स्पष्ट झाले.संजय फुणगूस हा विदर्भ ग्रामीण बँक वेलदूर येथे सराफ म्हणून कामाला होता. बँक व्यवस्थापक सुनेत्रा दुर्गुळी व त्याची चांगली ओळख होते. पैशाच्या हव्यासापोटी दोघांनी दोरीने गळा आवळून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पायाला व कमरेला पिवळ्या नॉयलॉन दोरीने घट्ट बांधून रस्सीला दोन मोठे दगड बांधून नवानगर जेटीसमोर पाण्यात ढकलून दिले.

अवघ्या काही तासातच गुहागर पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. के. जाधव, किरणकुमार कदम, आनंदराव पवार तसेच रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे शाखा अन्वेषण शाखेच्या पथकाने शोध घेतला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी