शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोकणवासीयांनो स्वागताला तयार व्हा, गणेशोत्सवासाठी मुंबईकर उद्यापासून येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:01 IST

कोकणात यावर्षी येणार पाच हजार बसेस

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईकरांची पावले हळूहळू कोकणाकडे वळू लागली आहेत. कोकणात येणाऱ्या मुंबईकरांसाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा गाड्यांचे नियाेजन केले आहे. शनिवार (२३ ऑगस्ट) पासून मुंबई व उपनगरातून गाड्या सुटणार असून, रविवारी मुंबईकर कोकणात दाखल होणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांसाठी यावर्षी पाच हजार जादा बसेस सोडण्यात येणार असून, रत्नागिरी जिल्ह्यात २५०० पेक्षा जादा गाड्या येणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.कोकणवासीयांचा आवडता गणेशाेत्सव अवघ्या चार दिवसांवर आला आहे. कोकणात घरोघरी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येत असल्याने काेकणातील घरे मुंबईकरांच्या येण्याने गजबजून जातात. एसटी, रेल्वे किंवा खासगी वाहनाने मुंबईकर गणेशाेत्सवाला गावी दाखल हाेतात. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या मुंबईकरांसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दि. २३ ऑगस्टपासून २७ ऑगस्टपर्यंत जादा गाड्या काेकणात येणार आहेत.

जवळपास सात ते आठ तासांचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रत्येक आगारातील उपाहारगृहातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरेसे खाद्यपदार्थ, प्रसाधनगृह स्वच्छतेबाबत प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मंडणगड ते राजापूर या तालुक्यांत जादा गाड्या येणार असून, आलेल्या सर्व गाड्या त्या-त्या आगारात थांबवून ठेवण्यात येणार आहेत. या गाड्या परतीच्या प्रवासासाठी साेडण्यात येणार आहेत.

  • कशेडी ते चिपळूण, संगमेश्वर ते हातखंबा, हातखंबा ते राजापूर मार्गावर तीन गस्तीपथके.
  • खेड, चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा या चार ठिकाणी दुरुस्ती पथके.
  • भरणे नाका, चिपळूण, हातखंबा तिठा येथे ब्रेकडाऊन व्हॅन असणार.
  • जादा गाड्या घेऊन येणारे चालक अन्य जिल्ह्यांतील असल्याने मार्ग दाखविण्यासाठी ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत.
  • एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथकही महामार्गावर कार्यरत राहणार आहे.

गणेशभक्तांचे आगमन लवकरच होणार असून, मंडणगड ते राजापूर आगारांत जादा गाड्या येणार आहेत. या गाड्या त्या-त्या आगारात थांबवून ठेवण्याची सूचना संबंधित आगार प्रमुखांना करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासासाठी दि. २ सप्टेंबरपासून गाड्या सुटणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन आरक्षण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. - प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी