सकाळी काँग्रेसमध्ये, दुपारी भाजपची सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:23 PM2021-02-12T13:23:50+5:302021-02-12T13:25:37+5:30

Rajapur Sarpacnch Bjp Ratnagiri- निवडणुकीत काँग्रेसकडून विजयी झालेल्या महिला सदस्याने बुधवारी सकाळी अचानक भाजपत जाहीर प्रवेश करून दुपारी सरपंचपद मिळवले. तालुक्यातील पांगरे बुद्रुक ग्रामपंचायतीमधील या नाट्यमय घडामोडीने तालुक्यात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

In the morning Congress, in the afternoon BJP Sarpanch | सकाळी काँग्रेसमध्ये, दुपारी भाजपची सरपंच

सकाळी काँग्रेसमध्ये, दुपारी भाजपची सरपंच

Next
ठळक मुद्देसकाळी काँग्रेसमध्ये, दुपारी भाजपची सरपंचनाट्यमय घडामोडीने तालुक्यात चांगलीच खळबळ

राजापूर : निवडणुकीत काँग्रेसकडून विजयी झालेल्या महिला सदस्याने बुधवारी सकाळी अचानक भाजपत जाहीर प्रवेश करून दुपारी सरपंचपद मिळवले. तालुक्यातील पांगरे बुद्रुक ग्रामपंचायतीमधील या नाट्यमय घडामोडीने तालुक्यात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

राजापूर तालुक्यातील पांगरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत हा सनसनाटी प्रकार पाहायला मिळाला. काँग्रेसकडून निवडून आलेल्या वैष्णवी संतोष कुळ्ये यांनी अचानक भाजपात प्रवेश करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यानंतर, भाजपकडून सरपंचपदाची निवडणूक लढवून त्यांनी शिवसेनेच्या अवंतिका जयवंत पवार यांचा पराभव केला. पाठोपाठ भाजपच्या अनुजा सत्तेश पवार यांनी शिवसेनेचे विश्वनाथ दत्ताराम सावंत यांचा पराभव करून उपसरपंचपदाची निवडणूकही जिंकली.

काँग्रेसच्या अन्य दोन सदस्यांनी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मतदान केले. त्यामुळे ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे. पांगरेमधील सरपंच व उपसरपंचाच्या निवडणुकीसाठी प्रभाकर तुकाराम बेंद्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

पांगरे बुद्रुक ग्रामपंचायतीत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. सात जागांपैकी शिवसेना व काँग्रेसने ३/३ जागा जिंकल्या, तर एक जागा भाजपाने पटकावली होती. त्यामुळे सरपंच व उपसरपंचपदासाठी जोरदार चुरस निर्माण झाली होती. कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने युती वा आघाडीचे समीकरण जुळविले जाण्याची शक्यता वर्तविली जात होती.

राज्यातील राजकारणात शिवसेना व भाजपचे संबंध बिघडले असले, तरी शिवसेनेचे तीन व भाजपचा एक असे चार सदस्य युती करून सत्ता स्थापणार की, येथेही महाविकास आघाडीची सत्ता येणार, याकडे सर्वांचे लक्ष होते.

प्रत्यक्षात, सर्वच राजकीय आडाखे चुकीचे ठरविणारी घटना बुधवारी घडली. काँग्रेसकडून सरपंचपदाच्या प्रमुख दावेदार असलेल्या वैष्णवी संतोष कुळ्ये यांनी अचानक भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांच्या उपस्थितीत भाजपत जाहीर प्रवेश केला. त्यांना भाजपकडून सरपंचपदासाठी, तर भाजपच्या एकमेव निवडून आलेल्या सदस्या अनुजा सत्तेश पवार यांना उपसरपंच पदाची, तर शिवसेनेकडून सरपंच पदासाठी अवंतिका जयवंत पवार आणि उपसरपंचपदासाठी विश्वनाथ सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, भाजपने शिवसेनेसह काँग्रेसला धोबीपछाड देताना पांगरे बुद्रुकमध्ये कमळ फुलविले.

 

Web Title: In the morning Congress, in the afternoon BJP Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.