खेडमध्ये पावसासाठी मनसेचे महादेवाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:47 IST2019-06-28T13:46:21+5:302019-06-28T13:47:51+5:30
वरुणराजाच्या आगमनाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शहरातील खांबतळे येथील शिवमंदिरातील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून मंदिराचा गाभारा पाण्याने भरण्यात आला. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी शंभुमहादेवाला यावेळी साकडे घालण्यात आले.

खेडमध्ये पावसासाठी मनसेचे महादेवाला साकडे
खेड : वरुणराजाच्या आगमनाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शहरातील खांबतळे येथील शिवमंदिरातील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून मंदिराचा गाभारा पाण्याने भरण्यात आला. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी शंभुमहादेवाला यावेळी साकडे घालण्यात आले.
रोहिणी आणि मृग कोरडे गेल्यानंतर आता आर्द्रा सुरू होऊनही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे आर्द्रा नक्षत्रात लावणीकामासाठी लागणारा कोकणातील शेतकरी चिंतातूर झाला आहे. महादेवाचा गाभारा पाण्याने भरल्यास वरुणराजा प्रसन्न होईल आणि पाऊस पडेल, अशी हिंदू धर्मात धारणा आहे. पावसाचे आगमन लांबल्यास देशभरात विविध मंदिरांचे गाभारे पाण्याने भरण्याची पद्धत आहे.
शंकर मंदिरात परिसरातील महिला, पुरुषांनी महादेवाच्या पिंडीचा गाभारा पाण्याने भरुन पाऊस पडण्यासाठी वरूणराजाला साकडे घातले. शहरातील खांबतळे येथील शिवमंदिराचा गाभारा पाण्याने भरून पावसासाठी देवालाच साकडे घालण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण विभागीय संघटक व खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विश्वास मुधोळे, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तालुका अध्यक्षा राजश्री पाटणे, शहर अध्यक्षा उर्मिला शेट्ये-पाटणे, मनाली पावसकर, भरणे ग्रामपंचायत सरपंच ललिता चिले, नंदू साळवी, उपजिल्हा अध्यक्ष शैलेश धारीया, खेड तालुका अध्यक्ष पुष्पेन दिवटे, शहर अध्यक्ष प्रसाद शेट्ये, उपशहर अध्यक्ष सिध्देश साळवी, दादु नांदगावकर, गणेश सुर्वे, कौशल चिखले, अविनाश माने, संतोष पवार व खेड शहरातील नागरिक उपस्थित होते.