शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, मनसेच्या मुंबई उपशाखाप्रमुखाचा मृत्यू; राज ठाकरेंच्या सभेला येताना घडली दुर्घटना

By अरुण आडिवरेकर | Updated: May 6, 2023 13:54 IST

तर पाच जण जखमी झाले

रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रत्नागिरीत हाेणाऱ्या सभेला येणाऱ्या  मनसेसैनिकांच्या गाडीला मुंबई-गाेवा महामार्गावरील तुरळ (ता. संगमेश्वर) येथे आज सकाळी अपघात झाला. या अपघातात मुंबईतील मनसेचे उपशाखाप्रमुख देवेंद्र जगन्नाथ साळवी यांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत.रत्नागिरी येथे  आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयाेजित करण्यात आली आहे. या सभेला रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, रायगडसह राज्यातील विविध भागातून कार्यकर्ते माेठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल हाेत आहेत. या सभेसाठी मुंबईहून देवेंद्र जगन्नाथ साळवी (४१) आपल्या ५ सहकाऱ्यांसह इनाेव्हा कार (एमएच ४३, व्ही ९२०१) घेऊन रत्नागिरीकडे येत हाेते. महामार्गावरील तुरळ येथील सद्गुरू सेवा केंद्राजवळ गाडी आली असता कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि गाडीला अपघात झाला.या अपघातात जखमी झालेल्या देवेंद्र साळवी यांना रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर गाडीतील सहप्रवासी किरकाेळ जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.देवेंद्र साळवी हे मुंबईतील मनसेचे सक्रिय कार्यकर्ते होते. उपशाखाप्रमुख म्हणून ते जबाबदारी सांभाळत हाेते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर आदींनी रुग्णालयात धाव घेतली. या निधनामुळे मनसेसैनिकात शोककळा पसरली आहे. या अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पाेलिस स्थानकातील पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAccidentअपघातhighwayमहामार्ग