शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

आमदार राजन साळवी यांची आज पुन्हा 'एसीबी'कडून चौकशी

By मनोज मुळ्ये | Published: March 04, 2024 12:51 PM

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी यांची आज पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात चौकशी ...

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी यांची आज पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यारत्नागिरी कार्यालयात चौकशी होणार आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबालाही उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.जानेवारी २०२४ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेराजन साळवी यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. अवैध मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी आमदार राजन साळवी आपल्या कुटुंबीयांसह रत्नागिरीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत. उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देताना दिलेल्या निर्देशानुसार, आज साळवी कुटुंबीय चौकशीसाठी हजर राहतील. न्यायालयाने जामीन दिल्यानंतर दिलेल्या निर्देशानुसार राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ आणि वहिनी असे पाच जण हजर राहून चौकशीला सहकार्य करणार आहेत.राजन साळवी यांची पत्नी आणि भावाची दोन दिवसापूर्वी एसीबी चौकशी झाली. आमदार राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला १ मार्चला चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली होती. राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला नोटीस बजावण्यात आली होती. जबाब नोंदवण्यासाठी त्यांना आली होती. जबाब नोंदवण्यासाठी त्यांना रत्नागिरीच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना या नोटीसद्वारे देण्यात आल्या होत्या.अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीने दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आज आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाला कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajan Salviराजन साळवीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग