शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी-शिंदे सेनेत धुसफुस?, अजित पवारांच्या स्नेहभोजनावरुन भास्कर जाधवांचा मिश्किल टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 15:36 IST

४ गेले तर ४० जण तयार करण्याची धमक 

रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणताच दिवस, वार, तिथी पाळत नाहीत. त्यांच्याकडे नेहमीच मांसाहारी जेवण असते आणि शिंदे सेनेच्या मंत्र्यांचा श्रावण असेल म्हणून ते त्यांच्याकडे जेवणासाठी गेले नसावेत, असा मिश्किल टोला उद्धव सेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी हाणला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलवलेल्या स्नेहभोजनाला केवळ एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र शिंदे सेनेचा एकही मंत्री नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे सेना यांच्यामध्ये धुसफुस आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत आमदार जाधव यांनी हा मिश्किल टोला हाणला.अजित पवार यांच्यासोबत आपण पंधरा वर्षे काम केले आहे. ते नेहमी उत्तमोत्तम मांसाहारी जेवण खाऊ घालतात. मात्र सध्या श्रावण सुरू आहे, हे त्यांच्या लक्षात नसावे. बहुदा म्हणूनच शिंदे सेनेचे मंत्री त्यांच्याकडे जेवायला गेले नसावेत, असे भास्कर जाधव यांनी गुहागर येथे पत्रकारांशी बोलताना मिश्किलपणे सांगितले.भास्कर जाधव यांची पक्ष सोडून गेलेल्यांबाबतची एक पोस्ट मंगळवारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जे सोडून गेले, त्यांच्याबद्दल आपण कधीच वाईट बोलत नाही. मात्र जेव्हा आपल्यावर बोलण्याची वेळ येते तेव्हा आपण अजिबात सोडत नाही, असेही ते म्हणाले. ४ गेले तर ४० जण तयार करण्याची धमक जे उद्धवसेना सोडून गेले आहेत, ते इतरांना आपल्यासोबत येण्याचा आग्रह करत आहेत. मात्र सोडून गेले लोक भावनिकतेला बळी पडले आहेत. अर्थात ४ जण सोडून गेले तर ४० जण तयार करण्याची धमक अजूनही आपल्याकडे आहे आणि आपण ते करून दाखवू, असेही जाधव यांनी या व्हायरल पोस्ट बाबत सांगितले.