शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरहून हिंगोलीला निघालेले बेपत्ता शिक्षक कुटुंबीयांसह सुखरूप सापडले, नेमकं काय घडलं.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:56 IST

चिपळूण परिसरात असताना त्यांचा अचानक संपर्क तुटला होता

चिपळूण : गुहागर तालुक्यात कार्यरत असलेले शिक्षक ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी व मुलासह गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर गुरुवारी सकाळी त्यांचा माण तालुक्यातील गोंदवले महाराज मठ परिसरात शोध लागला आहे. चव्हाण कुटुंब दर्शनासाठी गोंदवले येथे आले असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. स्थानिकांनी त्यांना ओळखताच संबंधित अधिकाऱ्यांना व नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर दूरध्वनीद्वारे संपर्क होऊन ते सर्वजण सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.     गणेशोत्सवाच्या निमित्ताने चव्हाण कुटुंब आपल्या मूळ गावी हिंगोलीकडे निघाले होते. मात्र, मंगळवारी संध्याकाळी चिपळूण परिसरात असताना त्यांचा अचानक संपर्क तुटला होता. मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संवाद साधता न आल्याने नातेवाईकांनी तक्रार नोंदवली होती. पोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात होती. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आज सकाळी सुखरूप शोध लागल्याने नातेवाईक, सहकारी शिक्षक व गावकऱ्यांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. प्रशासनानेही त्यांच्या सुखरूप शोध लागल्याची पुष्टी केली आहे.पती, पत्नी व दोन मुल असं असलेलं चव्हाण कुटुंब चिपळूणहून कुंभार्ली घाटातून प्रवास करीत असताना त्यांचा एक मोबाईल पाण्यात भिजल्याने बंद पडला. तसेच दुसऱ्या मोबाईलचे चार्जिंग संपल्याने तोही बंद पडला. त्यामुळे चव्हाण कुटुंबियांचा संपर्क तुटला. त्यानंतर ते बेपत्ता झाले असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे त्यांची चौकशी सुरु होती. याचदरम्यान त्यांची गाडी हेळवाकहून पाठणच्या दिशेने निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध झाले होते. मात्र आता हे कुटुंब सुखरूप असून त्यांचा कुटुंबाशी संपर्क झाल्याने कुटुंबीय सुखावून गेले आहेत.