गुहागरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पॉस्कोअंतर्गत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:42 IST2019-10-07T14:41:20+5:302019-10-07T14:42:30+5:30
गुहागर तालुक्यात गुरे चरवण्यासाठी गेलेल्या सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४० वर्षीय प्रौढाने लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुहागरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पॉस्कोअंतर्गत अटक
गुहागर : तालुक्यात गुरे चरवण्यासाठी गेलेल्या सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४० वर्षीय प्रौढाने लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही अल्पवयीन मुलगी तिसरीमध्ये शिकत असून, रविवारी सायंकाळी गुरे चरण्यासाठी गेले असता एकटी असल्याचा फायदा घेत प्रकाश शंकर वाघे (४०) याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत त्या मुलीने घरी सांगितल्यानंतर तिच्या आईने रात्री उशिरा गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
या फिर्यादीनंतर महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपी यास अटक करण्यात आली आहे.