शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

रत्नागिरीत कामांना मुहूर्तच नाही; कोट्यवधींची विकासकामे अडकलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 13:37 IST

पावसाचा मुक्काम यावर्षी जास्त असल्याने ऑक्टोबरपर्यंत विकासकामे ठप्प होती. त्यातच सप्टेंबरमध्ये पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली. आॅक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्याने विकासकामे या आचारसंहितेत पुन्हा अडकली.

ठळक मुद्देनिवडणुकांसाठीची आचारसंहिता, अतिवृष्टी, सत्तास्थापनेचा घोळ याचा मोठा परिणाम

रत्नागिरी : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०१९ - २०अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी २०१ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असला तरी यावर्षी झालेल्या दोन निवडणुका, वादळी पावसाचा वाढलेला मुक्काम आणि त्यानंतर आता महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेत झालेला घोळ यामुळे या आर्थिक वर्षात ६७ कोटी ३५ लाख रूपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरी आतापर्यंत विविध यंत्रणांचा केवळ ३९ कोटी ४१ लाख रूपये एवढाच खर्च झाला आहे.२०१९ - २० या आर्थिक वर्षासाठी २०१ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ११९ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. मात्र, या आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच म्हणजेच २३ एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक लागल्याने आणि त्यानंतर महिनाभराने म्हणजेच २३ मे रोजी मतमोजणी झाल्याने हा पूर्ण महिना आणि त्याआधी ४५ दिवस आचारसंहिता म्हणजेच हे दोन्ही महिने आचारसंहितेत अडकले. त्यानंतर जेमतेम जून गेल्यानंतर जुलैपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली.

पावसाचा मुक्काम यावर्षी जास्त असल्याने ऑक्टोबरपर्यंत विकासकामे ठप्प होती. त्यातच सप्टेंबरमध्ये पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली. आॅक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्याने विकासकामे या आचारसंहितेत पुन्हा अडकली.विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला. त्यात लोकप्रतिनिधीही संभ्रमावस्थेत असल्याने नोव्हेंबर महिनाही तसाच गेला. त्यामुळे यावर्षी वाढीव निधी मिळूनही विकासकामेच थांबल्याने निधी कसा खर्च होणार? लोकसभा निवडणुकीनंतर तत्कालीन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी प्रशासकीय मान्यतेसाठी तत्काळ विकासकामांचे अंदाजपत्रक दाखल करण्यात येईल असे, सांगितले होते.

मात्र, जिल्हा परिषदेसह अन्य बहुतांश यंत्रणांकडून कामांची अंदाजपत्रके सादरच करण्यात न आल्याने प्रशासकीय मान्यता फारच थोड्याच कामांना मिळाली. त्यांच्या कामांचे आदेश मिळाल्याने काहीअंशी निधी खर्च झाला. मात्र, आतापर्यंत केवळ ४० कोटी रूपयेच खर्च झाले असून, उर्वरित १६१ कोटी रूपये कामांच्या खर्चाचे शिवधनुष्य कसे पेलणार, असे म्हटले जात आहे.बिगर गाभा क्षेत्र प्रतीक्षेतबिगर गाभाक्षेत्रात पाटबंधारे व पूरनियंत्रण, ऊर्जा, उद्योग व खाणकाम, परिवहन, सामान्य व आर्थिक सेवा, सामान्य सेवा अशा सहा क्षेत्रांचा समावेश आहे. यासाठी ११३ कोटी ४० लाख रूपयांचा निधी मिळूनही आत्तापर्यंत केवळ ३७ कोटी २३ लाखांची झाली आहेत.आता चार महिनेच हातीया आर्थिक वर्ष संपण्यास आता जेमतेम चार महिने राहिले आहेत. या कालावधीत आता विविध यंत्रणांनी विकासकामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करून त्यांना प्रशासकीय मंजुरी घेणे गरजचे आहे.केवळ ३३ टक्के निधीच आतापर्यंत खर्चशासनाकडून जिल्ह्यासाठी ११९ कोटी ५० लाख ४५ हजार रूपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडे प्राप्त झाला आहे. जिल्हा नियोजनकडून ६७ कोटी ३५ लाख रूपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी ३९ कोटी ५० लाख ४५ हजार रूपयांचा निधी विविध कामांवर खर्च झाला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMuncipal Corporationनगर पालिका