शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

पूर्वी शिवाजी पार्कवर दणदणीत सभा; आता चावडीवर बैठका; उदय सामंतांचा ठाकरे गटावर जोरदार प्रहार 

By मनोज मुळ्ये | Updated: January 8, 2024 19:17 IST

'निवडणुकीपूर्वी पक्षप्रवेश करु, असे इकडे तिकडे सांगतात. अशा लोकांना कालमर्यादा द्यावी'

राजापूर : यापूर्वी शिवाजी पार्कवर ज्यांच्या दणदणीत सभा होत होत्या, त्यांच्यावर चावडीवर बैठका घेण्याची वेळ आली, अशा शब्दात राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. आगामी निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांची अनामत रक्कमही जप्त होईल, असा दावा त्यांनी केला.राजापुरातील राजीव गांधी मैदानावर शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानांतर्गत सभेत ते बोलत होते. यापूर्वी १९९० साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची राजापूरला विशाल जाहीर सभा झाली होती. त्यानंतर कोकणातील राजकीय चित्र बदलले आणि शिवसेनेचे सर्वच आमदार विजयी झाले होते. शिवसेनेच्या विजयाची मुहूर्तमेढ राजापुरातून रोवली गेली होती, याची त्यांनी आठवण करुन दिली.मागील १५ महिन्यांच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती शासनाने अनेक विकासात्मक निर्णय घेतले. कोकणाला खऱ्या अर्थाने न्याय देऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार केले. रत्नागिरीत सुमारे ५२२ कोटी रुपयांच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे गती मिळाली व ते सुरुही झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत आपलाच खासदार निवडून येईल आणि विरोधकांची अनामत रक्कमही घालवली जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.पालकमंत्री सामंत यांनी यावेळी महायुती सरकारने केलेल्या कामांचा विस्तृत उल्लेख केला. आंबा, काजू बोर्डसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका आणि त्यासाठी मंजूर केलेला निधी यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

सामंत यांचा रोख कोणाकडेकाहीजण आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे आहोत. निवडणुकीपूर्वी पक्षप्रवेश करु, असे इकडे तिकडे सांगतात. अशा लोकांना कालमर्यादा द्यावी, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यांचा रोख नेमका कोणावर होता, याची चर्चा आता राजापुरात सुरू झाली आहे. हा टोला राजापूरवरुनच हाणलेला नाही ना, असा प्रश्नही आता राजकीय कार्यकर्ते आपापसात करत आहेत.

रिफायनरी, उमेदवारी हे विषय बाजूलाचराजापूर तालुक्यात बहुचर्चित आणि लांबकळत राहिलेली रिफायनरी तसेच शिवसेना आणि भाजपा नेत्यांच्या विधानांमुळे चर्चेत आलेली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची उमेदवारी या दोन्ही विषयांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीतरी भाष्य करतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी सफाईने हे दोन्ही विषय टाळले.

समर्थक, विरोधक मुख्यमंत्र्यांना भेटलेरिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन प्रकल्प समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही गटांमधील लोकांनी राजापूर विश्रामगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट स्वतंत्रपणे घेतली. दोन्ही बाजूच्या लोकांनी आपापल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर केले आहे. मात्र यावेळी कोणती चर्चा झाली, त्याचा तपशील अजून पुढे आलेला नाही.

अनेकांचा पक्षप्रवेशमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यावेळी काहींनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामध्ये राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, रवींद्र बावधनकर, पाचलचे माजी विभागप्रमुख गोपीनाथ उर्फ आप्पा साळवी, तळवडेच्या लोकनियुक्त सरपंच गायत्री साळवी व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरे