शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सत्तेच्या दुरुपयोगामुळे वैद्यकीय महाविद्यालय अधोगतीकडे, विनायक राऊत यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 19:01 IST

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साकारणे हे आमचे स्वप्न होते. त्यासाठी वित्तीय तरतुदीसह या महाविद्यालयाला मंजुरी देण्यात ...

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय साकारणे हे आमचे स्वप्न होते. त्यासाठी वित्तीय तरतुदीसह या महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आली. मात्र, सद्य:स्थितीत या महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली पदे विद्यमान सरकारकडून भरली जात नाहीत. खासदार, पालकमंत्री आणि स्थानिक आमदार सत्तेचा दुरुपयोग करून हे महाविद्यालय अधोगतीकडे नेत आहेत, असा आरोप करत येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी उद्धवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून दिला.येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक, श्रेया परब आदी उपस्थित होते.  यावेळी राऊत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला आरोग्य सेवेसाठी गोवा बांबुळी येथे अवलंबून राहावे लागू नये यासाठी उद्धवसेनेच्या सरकारच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले.

मात्र, आजही येथील नागरिकांना गोवा बांबुळी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. हे दुर्दैव आहे. असे सांगत आज आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांच्याशी चर्चा केली असता या महाविद्यालयासाठी आवश्यक असलेले विविध पदे भरण्यात आलेली नाहीत. यात स्पेशालिस्ट डॉक्टरसह प्राध्यापक, सहप्राध्यापकांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. मात्र, याकडे शासनकर्ते हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला आहे.एकदाही भेट दिली नाही आणि देणारही नाहीत!विद्यमान खासदार नारायण राणे यांनी या वैद्यकीय महाविद्यालयाला एकदाही भेट देऊन येथील समस्या जाणून घेतलेल्या नाही. त्यामुळे याकडे त्यांचा दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांना हे महाविद्यालय सुरू ठेवायचे नसल्याने ते या महाविद्यालयाला भेटही देणार नसल्याचा गौप्यस्फोट विनायक राऊत यांनी यावेळी केला.एका रात्रीत घर पाडतात मग..एका रात्रीत ओरोस येथील महामार्ग नजीकच्या गादी कारखान्यालगत घरावर पालकमंत्र्यांकडून कारवाई केली जाते. मग सर्वसामान्य जनतेला लाभदायी ठरणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे लक्ष का दिले जात नाही, असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVinayak Rautविनायक राऊत Nitesh Raneनीतेश राणे MahayutiमहायुतीMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालय