Maratha Kranti Morcha : दापोलीत दणाणला मराठा समाजाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 14:16 IST2018-07-27T14:14:46+5:302018-07-27T14:16:17+5:30
असे कसे देत नाही, घेतल्या शिवाय राहात नाही, अशा घोषणा देत दापोली तालुका सकल मराठा समाजातर्फे दापोलीत मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे, असे निवेदन दापोलीच्या तहसीलदार कविता जाधव यांना देण्यात आले.

Maratha Kranti Morcha : दापोलीत दणाणला मराठा समाजाचा मोर्चा
दापोली : असे कसे देत नाही, घेतल्या शिवाय राहात नाही, अशा घोषणा देत दापोली तालुका सकल मराठा समाजातर्फे दापोलीत मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे, असे निवेदन दापोलीच्या तहसीलदार कविता जाधव यांना देण्यात आले. राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. दापोली तालुक्यात आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे मोर्चा काढून तहसीलदाराना निवेदन देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठा मंदिरपासून मोर्चाला सुरूवात झाली. सकाळी ९ वाजल्यापासून मराठा मंदिर येथे सर्व समाज बांधव एकत्र जमले. या ठिकाणाहून मोर्चा निघाला. हा मोर्चा शहरातील केळसकर नाका, पोलीस लाईन, बाजारपेठेतून थेट तहसील कार्यालयावर धडकला.
मराठा समाजाने गुरुवारी दापोली बंदची हाक दिली. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. दापोली शहरात निघालेला मराठा मोर्चा अतिशय शांततेत पार पडला. मोर्चाला कुठेही गालबोट लागले नाही. अतिशय शिस्तीत हा मोर्चा निघाला होता. दापोली तालुका सकल मराठा समाजाचे नेतृत्व अध्यक्ष सुनील दळवी यांनी केले.