मिशन विधानसभा! अनेकांना पक्षांतराचे वेध, तर काहींना तिकिटाची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 04:32 AM2019-08-03T04:32:59+5:302019-08-03T04:35:22+5:30

युतीच्या निर्णयावर ठरणार अनेक गुणाकार : पक्ष बदलण्याची शक्यता अधिक, अनेक जण तळ्यात-मळ्यात

Many suffer from paralysis, while others worry about tickets in ratnagiri | मिशन विधानसभा! अनेकांना पक्षांतराचे वेध, तर काहींना तिकिटाची चिंता

मिशन विधानसभा! अनेकांना पक्षांतराचे वेध, तर काहींना तिकिटाची चिंता

googlenewsNext

मनोज मुळेय ।

रत्नागिरी : विद्यमान आमदार हेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार असणार हे निश्चित असले तरी, त्यातील काहींचे पक्ष बदलणार आहेत. त्यामुळे निवडणुका जवळ आल्या असल्या तरी जिल्ह्यात अजून निवडणुकीचे वातावरण तयार झालेले नाही. जिल्ह्यात राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर आणि दापोली असे पाच विधानसभा मतदार संघ आहेत. २0१४ साली राजापूर मतदारसंघात शिवसेनेचे राजन साळवी, रत्नागिरीत शिवसेनेचे उदय सामंत, चिपळूणमध्ये शिवसेनेचे सदानंद चव्हाण, गुहागरात राष्ट्रवादीचे भास्कर जाधव आणि दापोलीत राष्ट्रवादीचे संजय कदम विजयी झाले.

पाचपैकी तीन मतदारसंघ शिवसेनेकडे आणि दोन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असे चित्र २0१४ साली विधानसभा निवडणुकीत दिसले असले तरी त्यानंतर झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक आणि नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून आले. शिवाय, जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली. लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेनेच सर्वाधिक मते घेतली. त्यामुळे आजच्या घडीला शिवसेना हाच जिल्ह्यात सर्वात सक्षम पक्ष आहे.

राजापूर, रत्नागिरी येथे शिवसेनेचा बोलबाला आहे. चिपळूणमध्ये गतवेळी सदानंद चव्हाण यांना राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांच्यासमोर केवळ ६0६८ मतांची, तर दापोलीत संजय कदम यांना सेनेच्या सूर्यकांत दळवी यांच्यासमोर ३,७८४ मतांची आघाडी मिळाली होती. याहीवेळी या दोन ठिकाणी चुरशीची लढत अपेक्षित आहे. सध्या अनेक नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू आहे. राजापूरमध्ये राष्ट्रवादीकडून तिकिटाची अपेक्षा करणारे अजित यशवंतराव काँग्रेसकडूनही इच्छुक आहेत. रत्नागिरीत एक बडा लोकप्रतिनिधी शिवसेनेतून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याशी खासदार विनायक राऊत यांनी आस्थेवाईकपणे केलेली चर्चा राजकारणाला वेगळी दिशा देऊ शकते. दापोलीत सूर्यकांत दळवी यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. आता त्यांच्याजागी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे संजय कदम यांच्याशी भाजप विशेष संपर्कात आहे. अर्थात शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तरच त्या चर्चा अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचतील, हे निश्चित आहे.

जिल्ह्यातील पाचही मतदार संघात हे असे काहीसे अस्थिर वातावरण आहे. शिवसेना हा सक्षम पक्ष असला तरी भाजपने सर्व मतदार संघात लढण्याची तयारी केली आहे. त्यासाठीच दमदार नेते पक्षात घेण्यावर अधिक भर दिला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दुसºया क्रमांकावर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आता खूप मोठ्या प्रमाणात ढेपाळली आहे. सद्यस्थितीत गुहागर आणि दापोली या दोन मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार असल्याने तेथे या दोन पक्षांची ताकद आहे. मात्र, तेथेही शिवसेना प्रबळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला येत्या विधानसभा निवडणुकीत फार मोठी संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चित्र शिवसेना आणि भाजपच्या युतीच्या निर्णयावर अवलंबून आहे. युती झाली तर युती विरूद्ध काँग्रेस आघाडी असे पारंपरिक चित्र दिसेल. मात्र युती झाली नाही तर आयात नेत्यांच्या ताकदीवर भाजपकडून शिवसेनेला जोरदार टक्कर दिली जाईल.

गेल्या निवडणुकीत दुसºया क्रमांकावरील उमेदवार : शिवसेना १, भाजप २, राष्ट्रवादी १, काँग्रेस १

सध्याचे पक्षीय बलाबल : एकूण जागा ५ : शिवसेना ३, राष्ट्रवादी २

सर्वात मोठा विजय
रत्नागिरी : उदय सामंत (शिवसेना) मते - ९३,८७६
(पराभव : बाळ माने, भाजप)

सर्वात कमी
मताधिक्याने पराभव
दापोली : सूर्यकांत दळवी - (शिवसेना) ३७८४
(विजयी : संजय कदम - राष्ट्रवादी)

Web Title: Many suffer from paralysis, while others worry about tickets in ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.