शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: रत्नागिरीत महायुतीसह महाविकास आघाडीला फटका, ४५३ उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:21 IST

७ नगराध्यक्ष पदांसाठी तब्बल ४३ उमेदवार

रत्नागिरी : इच्छुकांची वाढलेली संख्या, जागा वाटपातील अडचणी यामुळे जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीला फटका बसला आहे. महायुतीने आपली पडझड बऱ्याच अंशी सावरली असली तरी महाविकास आघाडीला मात्र अनेक ठिकाणी फटका बसला आहे. दरम्यान, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या ५० उमेदवारांपैकी ७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे नगराध्यक्षांच्या ७ जागांसाठी ४३ उमेदवार रिंगणार आहेत. नगरसेवकांच्या पदांसाठी पात्र ठरलेल्या ५४४ उमेदवारांपैकी ९१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता नगरसेवकांच्या एकूण १५१ जागांसाठी ४५३ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड या चार नगर परिषदा आणि गुहागर, देवरूख आणि लांजा या तीन नगरपंचायतींमधील नगराध्यक्षांच्या ७ जागांसाठी ५० उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. तर नगरसेवकांच्या एकूण १५१ जागांसाठी ५४४ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. १९ नोव्हेंबरपासून अर्ज माघारी घेण्यास प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी (दि. २१ नोव्हेंबर) शेवटच्या दिवसापर्यंत या सात स्वराज्य संस्थांमधील नगराध्यक्षाच्या जागेसाठी पात्र ठरलेल्या ५० पैकी ७ उमेदवारांनी या तीन दिवसांत अर्ज मागे घेतले आणि नगरसेवकाच्या जागांसाठी पात्र ठरलेल्या ५४४ उमेदवारांपैकी ९१ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सात नगराध्यक्षांच्या जागांसाठी ४३ उमेदवार आणि नगरसेवकांच्या १५१ जागांंसाठी ४५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.२६ नोव्हेंबर रोजी या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. याच दिवशी या उमेदवारांना निवडणूक चिन्हेही दिली जाणार आहेत.

महायुती संपली, युती बाकीरत्नागिरी, चिपळूण, गुहागर या तीन ठिकाणी महायुतीमधधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) बाहेर पडली आहे. तेथे फक्त शिंदे सेना आणि भाजपची युती आहे. याखेरीज राजापूर, लांजा येथे अनेक जागांवर तर रत्नागिरीत एका जागेवर भाजपने बंडखोरी केली आहे. त्यामुळे महायुतीत फूट पडली आहे. देवरुख आणि खेडमध्ये महायुती म्हणून तीन पक्ष एकत्र आहेत.

महाविकास आघाडीत मोठी बिघाडी

  • महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे. राजापूर, लांजा, देवरुख येथे महाविकास आघाडी म्हणून उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आहेत.
  • रत्नागिरीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने (शरद पवार) उद्धवसेनेची साथ सोडली आहे.
  • चिपळुणात महाविकास आघाडीतील तीनही पक्ष नगराध्यक्ष निवडणूक लढवत आहेत. चिपळुणात नगरसेवकांच्या सर्व जागांवर उद्धवसेनेने उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे तेथेही आघाडी फसली आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri Local Elections: Both Alliances Suffer Setbacks, 453 Candidates Compete

Web Summary : Ratnagiri's local elections see setbacks for both major alliances due to candidate numbers and seat allocation issues. Despite some recovery by Mahayuti, Mahavikas Aghadi faces significant losses. 43 candidates vie for 7 mayoral posts, and 453 compete for 151 council seats.