शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

मोदी, शाह यांची भाजप संघाला मान्य आहे का, उद्धव ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 14:27 IST

भाजपच्या मतदारांनीही विचार करावा, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी घ्या, बतावणी नको

रत्नागिरी : ज्यांनी भाजप रुजवला ते लोक आता नको आहेत. भाजपचे अध्यक्ष नड्डा सांगतात की, आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही. मोदी आणि शाह यांचा हा नवा भाजप संघाला मान्य आहे का, भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना मान्य आहे का, असा प्रश्न उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत केला. भाजपच्या मतदारांनीही हा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.उद्धवसेनेचे रत्नागिरीतील उमेदवार बाळ माने, राजापुरातील उमेदवार राजन साळवी यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी भाजप तसेच मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली.

यावेळी व्यासपीठावर माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, रमेश कदम, हुस्नबानू खलिफे, महाविकास आघाडीचे चिपळूणचे उमेदवार प्रशांत यादव, बशीर मुर्तुझा, मिलिंद कीर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्यावर घराणेशाहीचा आरोप केला जातो. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात दोन भाऊ निवडणूक लढवत आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन भाऊ आणि त्यांचे वडील राजकारणात आहेत. त्यावर कोणी बोलत नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी मंत्री सामंत यांच्यावरही त्यांनी टीका केली. २०१४ साली आयत्या वेळी भाजपने युती होणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यावी, असा प्रश्न होता. त्यावेळी उदय सामंत आमच्याकडे आले आणि त्यांना उमेदवारी देऊन मी चूक केली. त्यांना मंत्री बनवण्याचा शब्द दिला आणि तो आपण पाळलाही. मात्र, तरीही ते आपल्याला सोडून गेले, असा आरोप त्यांनी केला.आताची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे, असे सांगताना त्यांनी महाविकास आघाडीच्या आगामी धोरणांची घोषणा केली. शिक्षण, रोजगार, महिलांची सुरक्षितता, धान्याचे स्थिर भाव याबाबत त्यांनी विस्ताराने माहिती केली.

सुरुवातीला उद्धवसेनेचे मंगेश साळवी, राष्ट्रवादीचे मिलिंद कीर, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, रत्नागिरीचे उमेदवार बाळ माने यांची भाषणे झाली.

बारसू रिफायनरी प्रकल्प हद्दपार करणारजर आपली सत्ता आली तर बारसू रिफायनरी हद्दपार केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले. हा प्रकल्प चांगला असल्याचे चित्र आपल्यासमोर निर्माण करण्यात आले होते. त्यामुळे बारसू येथील जागेचा पर्याय आपण पुढे केला. मात्र, जर तो प्रकल्प जनतेला नको असेल तर तो हद्दपार करू, असे ते म्हणाले.

सुनावणी घ्या, बतावणी नकोसर्वोच्च न्यायालयासमोर ८ नोव्हेंबरला शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. अडीच वर्षे हे सर्व सुरू आहे. आता न्यायालयाने सुनावणी घ्यावी, बनावणी नको, असेही ते थेट म्हणाले. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली आहे. आता तरी न्यायदेवतेला सर्व काही दिसेल, अशी आपल्याला आशा आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ratnagiri-acरत्नागिरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024