शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक मतदान चिपळूणमध्ये, एकूण किती टक्के मतदान.. जाणून घ्या

By मनोज मुळ्ये | Updated: November 20, 2024 12:56 IST

रत्नागिरी : नागरिकांच्या उत्साहामुळे रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात २२.९३ टक्के ...

रत्नागिरी : नागरिकांच्या उत्साहामुळे रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात २२.९३ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात मतदान करुन प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी मतदारसंघाचा दौराही सुरू केला आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ५०.०४ टक्के मतदान झाले होते. चिपळूण मतदारसंघात सर्वाधिक ५२.३३ टक्के मतदान झाले.रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात ३८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यात तब्बल २२ उमेदवार अपक्ष आहेत. जिल्ह्यातील रत्नागिगरी, चिपळूण, गुहागर आणि दापोली या चार मतदारसंघात दोन प्रमुख उमेदवारांमध्ये थेट लढत होईल, असे चित्र आहे. केवळ राजापूर मतदारसंघात काँग्रेसकडून बंडखोरी झाली असल्याने तेथील लढत तिरंगी होत आहे.राजापूर, रत्नागिरी, गुहागर आणि दापोली या चार मतदारसंघात शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना असे उमेदवार रिंगणात आहेत, तर चिपळूण मतदारसंघात दोन राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. सकाळी ७ ते ११ या वेळेत दापोली मतदारसंघामध्ये १८.३२, गुहागरमध्ये १७.०५, चिपळूणमध्ये २४.५७, रत्नागिरीत १८.८० तर राजापुरात २४.०७ टक्के मतदान झाले आहे.मंत्री उदय सामंत, राजापूरचे उमेदवार किरण सामंत यांनी पाली येथे पहिल्या टप्प्यातच मतदान करुन मतदारसंघाचा दौरा सुरू करुन आढावा घेण्यास सुरुवात केली आह. मंत्री उदय सामंत यांनी प्रथम रत्नागिरी शहरातील अनेक बूथना भेट दिली आणि त्यानंतर ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला.

दुपारी ३ वाजेपर्यंतची आकडेवारीदापोली - ५०.८%गुहागर - ४९.०१%चिपळूण- ५२.३३%रत्नागिरी - ४६.२%राजापूर- ५२.१९%

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ratnagiri-acरत्नागिरीdapoli-acदापोलीguhagar-acगुहागरrajapur-acराजापूरVotingमतदानthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024