शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे सेनेपाठोपाठ उद्धवसेनेचीही यादी जाहीर, सर्व विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात

By मनोज मुळ्ये | Updated: October 24, 2024 12:23 IST

युतीकडून गुहागरला कोण?

मनोज मुळ्येरत्नागिरी : निवडणुकीचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली तरी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली नसल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र शिंदे सेनेने मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केलेल्या आपल्या पहिल्या यादीत रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी तीन मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीतील चर्चा मात्र अजूनही सुरूच असल्याने कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता वाढत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. तोपर्यंत भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली होती. मात्र त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही उमेदवाराचा समावेश नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून चिपळूणचे आमदार शेखर निकम यांचेच नाव निश्चित असून, त्यांना एबी फॉर्मही देण्यात आला आहे.बुधवारी दुपारी राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश असून, चिपळूणसाठी त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. उद्धव सेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनाही पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला असल्याची माहिती साेशल मीडियावर फिरत आहे. मात्र त्यांच्या नावाबाबतही अधिकृत घोषणा झालेली नाही.

युतीकडून गुहागरला कोण?मंगळवारी रात्री उशिरा शिंदे सेनेने आपली पहिली यादी जाहीर केली. त्यात रत्नागिरीचे विद्यमान आमदार उदय सामंत, दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्यासह पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे उद्योजक व सिंधुरत्न समितीचे निमंत्रित सदस्य किरण सामंत यांच्या नावाचा समावेश आहे. चिपळूणचे जागा राष्ट्रवादीला (अजित पवार) देण्यात आली आहे. उर्वरित गुहागर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव पहिल्या यादीत नाही. तेथे नुकतेच शिंदे सेनेत दाखल झालेले माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल हेच उमेदवार असण्याची शक्यता अधिक आहे.

उद्धवसेनेत जुने चेहरे नव्याने समोर

  • शिंदे सेनेने जिल्ह्यातील उमेदवार देण्याबाबत आघाडी घेतली असली तरी महाविकास आघाडीच्या यादीची अद्याप प्रतीक्षाच आहे. महाविकास आघाडीकडून दापोलीत उद्धव सेनेचे संजय कदम, गुहागरला उद्धव सेनेचे भास्कर जाधव, चिपळूणला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत यादव आणि राजापुरात उद्धव सेनेचे राजन साळवी अशा नावांवर शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे. मात्र त्याबाबत अजून अधिकृत घोषणा नाही.
  • उद्धव सेनेसाठी सर्वाधिक प्रतिष्ठेच्या असलेल्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी अजूनही नावाची निश्चित झालेली नाही. भाजपचे माजी आमदार बाळ माने शिवबंधन बांधून मशाल हाती घेतील आणि ते उद्धव सेनेचे उमेदवार असतील, अशी मोठी चर्चा आहे. मात्र उद्धव सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाला विरोध केला आहे. त्यामुळे या जागेचे नाव अजून जाहीर झालेले नाही.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ratnagiri-acरत्नागिरीMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे