रत्नागिरीत विहिरीत पडलेल्या गव्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 14:10 IST2020-01-22T14:09:34+5:302020-01-22T14:10:04+5:30
सकाळी ही बाब लक्षात येताच वन खात्याला माहिती कळवण्यात आली

रत्नागिरीत विहिरीत पडलेल्या गव्याला जीवदान
रत्नागिरी : तालुक्यातील भाेके गावी मंगळवारी रात्री गवा रेडा विहिरीत पडला. विहिरीला काठ नसल्यामुळे तो आत पडला असल्याचा अंदाज आहे. सकाळी ही बाब लक्षात येताच वन खात्याला माहिती कळवण्यात आली. वन विभागाचे अधिकारी लगेचच घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने विहिरीच्या एका बाजूला खोदकाम करण्यात आले. त्या मार्गे वर येत रेडा पळून गेला.