शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रूग्णवाहिका ठरतायंत त्यांच्यासाठी जीवनदायिनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 4:38 PM

गेल्या पाच-दहा वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पूर्वी एखादे वाहन असलेल्या घरात आता चार-पाच दुचाकी, एक-दोन चारचाकी झाल्या आहेत. सारे रस्ते, महामार्ग कमी पडावेत एवढी अवस्था आहे. त्याउलट रस्त्यांची अवस्था विचित्र आहे. एवढी वाहने पेलण्याची क्षमता आपल्याकडील उपलब्ध रस्त्यामध्ये नाही. सारे रस्ते खराब आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे.

ठळक मुद्देजगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रूग्णवाहिका ठरतायंत त्यांच्यासाठी जीवनदायिनी!रुग्णवाहिका सेवा अपघातग्रस्तांना वरदान, १२,४५० जखमींचे प्राण वाचविण्यात यश

अरूण आडिवरेकर रत्नागिरी : गेल्या पाच-दहा वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पूर्वी एखादे वाहन असलेल्या घरात आता चार-पाच दुचाकी, एक-दोन चारचाकी झाल्या आहेत. सारे रस्ते, महामार्ग कमी पडावेत एवढी अवस्था आहे. त्याउलट रस्त्यांची अवस्था विचित्र आहे. एवढी वाहने पेलण्याची क्षमता आपल्याकडील उपलब्ध रस्त्यामध्ये नाही. सारे रस्ते खराब आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे.

अपघातानंतर अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कल्पनेतून रूग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली. आजवर या रूग्णवाहिका ५ हजार ८११ अपघातस्थळी धावल्या असून, १२ हजार ४५० जखमींचे प्राण वाचविण्यास सहाय्यभूत ठरल्या आहेत.नरेंद्रचार्य महाराजांनी भाविकांना व देणगीदारांना आवाहन केले. त्यातून २७ रुग्णवाहिका संस्थानला दान मिळाल्या. त्या आधारावर २०११पासून ही सेवा सत्यात आली. तेव्हापासून ती रात्रंदिवस, अखंड २४ तास सुरू आहे. सेवा पूर्णपणे मोफत सुरू ठेवली असून, जखमींकडून वा त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले जात नाहीत. गाड्याचे इंधन, त्यांची देखभाल व चालकांचा पगार सारे संस्थान करते. वर्षाला साधारण ६० ते ७० लाख रुपये या सेवेवर खर्च होत असतात. हे कार्यदेखील भाविकांनी दिलेल्या देणग्यातून सुरू आहे.सुरूवातीला मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेली ही सेवा टप्प्याटप्प्याने वाढत राज्याच्या हद्दीतील मुंवई-गोवा, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-हैदराबाद, मुंबई-आग्रा व पुणे-बंगलोर अशा पाच महामार्गांवर सुरू आहे. अपघातातील जखमींसाठी या रुग्णवाहिका जणू देवदूतच बनल्या आहेत.

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे ३१ मार्च २०१९पर्यंत या २७ रुग्णवाहिका ५,८११ अपघातस्थळी धावल्या आहेत. तसेच तेथील १२,४५० जखमींचे प्राण वाचविण्यास सहाय्यभूत ठरल्या आहेत. मुंबई - गोवा महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. एकतर अरुंद रस्ता, वेडीवाकडी वळणे, तीव्र उतार वा तीव्र चढ असलेला हा मार्ग आहे. वाहनांचा वेगही अपघाताचे मोठे कारण ठरत आहे. या महामार्गावर महाराष्ट्रच्या हद्दीत आजपर्यंत १,५२९ अपघात झाले, त्यात ३,७१५ जण जखमी झाले आहेत. 

समाधान मिळते२००९पासून चालक म्हणून काम करत आहे. माझ्या कामाला वेळ नाही, रात्री-अपरात्री केव्हाही निघावे लागते. जखमींना पाहून मनाला खूप वेदना होतात. तरीही मन घट्ट करून त्यांना धीर देतो. आपल्यामुळे दुसऱ्याचा जीव वाचल्याचे समाधान मिळते, मन:शांती मिळते.-धनेश शिवाजी केतकर, चालक 

दहा मिनिटात मदतखड्ड्याचा अंदाज न आल्याने वांद्री येथे मी व माझी पत्नी स्नेहा दुचाकीवरून पडून जखमी झालो. पत्नी बेशुद्ध पडली. कोणीतरी सांगितले, थांबा संस्थानची रूग्णवाहिका येईल आणि केवळ दहा मिनिटातच गाडी आली. त्यामुळे माझ्या पत्नीवर उपचार होऊन तिचे प्राण वाचले.- संदीप बोरसुतकर, अपघातग्रस्त

 

पाचही मार्गावर मदतकार्यपाचही महामार्गावरील रुग्णालयात पोहोचवलेल्या जखमींची संख्या अशी आहे. मुंबई-गोवा महामार्ग- ३,७१५. मुंबई - आग्रा महामार्ग- ३,७४४. मुंबई-हैदराबाद महामार्ग -१,८७५, मुंबई- अहमदाबाद महामार्ग- २,१२३, पुणे-बंगलोर महामार्ग-९९३. अशातऱ्हेने एकूण ५,८११ अपघातात १२,४५० जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात पोहोचवण्यात आले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयRatnagiriरत्नागिरी