देवरुखनजीक वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
By मनोज मुळ्ये | Updated: October 23, 2024 14:24 IST2024-10-23T14:23:43+5:302024-10-23T14:24:38+5:30
देवरुख : वाहनाच्या धडकेमुळे बिबट्या ठार झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवरुखनजीकच्या कांजिवरा येथे आज, बुधवारी सकाळी उघडकीस आली. जोरदार ...

देवरुखनजीक वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
देवरुख : वाहनाच्या धडकेमुळे बिबट्या ठार झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवरुखनजीकच्या कांजिवरा येथे आज, बुधवारी सकाळी उघडकीस आली. जोरदार धडकेमुळे बिबट्या जागीच ठार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
देवरुख ते मार्लेश्वर या मार्गावरील कांजिवरा गावानजीक बुधवारी सकाळी रस्त्यावर बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्याच्या आसपास रक्त पडलेले असल्याने वाहनाच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे. हा बिबट्या नर जातीचा असून, अंदाजे अडीच वर्षांचा आहे. अपघाताची माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.
देवरुखनजीकच्या कर्ली येथे दोन दिवसांपूर्वी एक बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. आता लगेचच ही दुसरी घटना घडली आहे.