Ratnagiri: कळंबट येथे दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला, एकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:31 IST2025-09-23T15:30:51+5:302025-09-23T15:31:34+5:30

आधीही एकावर हल्ला

Leopard attacks bike rider in Kalambat Ratnagiri, one injured | Ratnagiri: कळंबट येथे दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला, एकजण जखमी

संग्रहित छाया

चिपळूण : कळंबट येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुषार शिरकर व त्यांचा मुलगा कार्तिक यांच्यावर बिबट्याने शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास हल्ला केला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून, मुलगा थोडक्यात बचावला आहे. मुलाच्या पायाला बिबट्याचे नख लागल्याने तो जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

तुषार शिरकर हे मार्गताम्हाणे येथून मोटारसायकलने घरी जात होते. कळंबट बौद्धवाडीत पोहोचताच, अचानक बिबट्याने झडप घालून हल्ला केला. त्यावेळी त्यांच्यामागे मोटारसायकलवर बसलेल्या कार्तिकला बिबट्याचा पंजाला लागला. प्रसंगावधान राखून शिरकर यांनी मोटारसायकल वेगाने पुढे नेली मुलाच्या पायाला, अंगावर नखे लागल्याने किरकोळ जखम झाला असून, त्याला तत्काळ वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

आधीही एकावर हल्ला

हल्ल्यापूर्वी अवघ्या काही मिनिटांपूर्वी हाच बिबट्या घवाळ गावचे पोलिस पाटील सुनील बळकटे यांच्यावरही झडप घालण्याच्या तयारीत होता. सुदैवाने तेही वाचले. गेल्या काही दिवसांपासून कळंबट परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. त्याने या आधीही गावातील बकऱ्या, गुरे व कुत्र्यांवर हल्ला करून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. वाढलेल्या झाडीमुळे आणि जंगलतोडीमुळे बिबटे रस्त्यालगत फिरताना दिसत आहेत.

Web Title: Leopard attacks bike rider in Kalambat Ratnagiri, one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.