शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

देवगडात २१ दिवसांच्या बाप्पाला निरोप

By admin | Updated: September 18, 2014 23:21 IST

पोलीस कर्मचारी, त्यांच्या कुटुुंबियांसह देवगडमधील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

जामसंडे : देवगड पोलीस कर्मचाऱ्यांच्या गणरायाचे गुरूवारी एकविसाव्या दिवशी वाजतगाजत भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. गुरूवारी रात्री उशिरा देवगडच्या खाडीमध्ये हे विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी, त्यांच्या कुटुुंबियांसह देवगडमधील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.गणेश चतुर्थीनंतरच्या या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये देवगडच्या जुन्या पोलीस स्थानकामध्ये विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. या दिवसांमध्ये जिल्ह्यातील भजने, महिलांची भजने, फुगड्या, सत्यनारायणाची पूजा, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी सायंकाळी मोठ्या भक्तीभावाने गणरायाची आरती करण्यात आली. त्यानंतर देवगड बाजारपेठमार्गे किल्ला येथे वाजतगाजत, फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढून श्रींची मूर्ती नेण्यात आली.या प्रवासादरम्यान देवगडमधील ग्रामस्थांनी ठिकठिकाणी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली. त्यानंतर देवगड किल्ला येथील मारूती मंदिर परिसरामध्ये गणरायाची मूर्ती नेऊन तेथून पुढे खाडीमध्ये तिचे विसर्जन करण्यात आले. (वार्ताहर)