शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
2
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
3
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
4
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
5
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
6
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
7
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
8
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
9
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
10
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
11
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
12
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
13
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
14
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
15
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
16
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
17
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
18
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
19
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
20
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याला गळती, तज्ज्ञांकडून पाहणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 12:39 IST

गळती वेळीच राेखण्यात यश न आल्यास हे झरे अजून वाढण्याची भीती

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी बोगद्याला पहिल्याच पावसात एक-दोन नव्हे, तर आठ ते दहा ठिकाणी गळती लागली आहे. हे पाणी राेखण्यासाठी ठेकेदाराकडून बोगद्यात पत्रे लावण्यात आले आहेत. तरीही गळती थांबलेली नाही. याबाबत तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात आली असून, त्यावर ठोस उपाययोजना केली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.महामार्गावर धाेकादायक ठरणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय म्हणून दाेन किलाेमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या बोगद्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे एकाच बोगद्यातून लहान वाहनांसाठी वाहतूक सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. या पहिल्याच पावसामध्ये कशेडी बोगद्याला ठिकठिकाणी गळती लागल्याचे समाेर आले आहे.या बोगद्यात पाण्याचे फवारे वाहनांवर आणि दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत आहेत. या प्रकारामुळे बाेगद्यातून प्रवास करणारे वाहनचालक आणि दुचाकीस्वार त्रस्त झाले आहेत. बोगद्यातील गळती थांबविण्यासाठी व थेट वाहनांवर पडणारे पाणी रोखण्यासाठी बोगद्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने गळतीच्या ठिकाणी पत्रे लावले आहेत. मात्र, तरीही सिमेंटचे फेन्सिंग फोडून सात ते आठ ठिकाणी पाण्याचे झरे लागले आहेत. बाेगद्यात लागलेली गळती वेळीच राेखण्यात यश न आल्यास हे झरे अजून वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे.

कशेडी बोगद्याला लागलेली गळती व बोगद्यात छतावरून कोसळणारे पाणी या घटनेची काही दिवसांपूर्वी जिओलॉजिकल तज्ज्ञांनी पाहणी केली आहे. ही गळती रोखण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे. - संताेष शेलार, मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग