तीन वर्षात घरोघरी पाईपने गॅस पुरवठा, रत्नागिरी ठरणार देशातील पहिला जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 13:48 IST2018-05-03T13:48:06+5:302018-05-03T13:48:06+5:30
येत्या तीन वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील घराघरांमध्ये पाईपद्वारे स्वयंपाक गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. एलपीजी गॅसपेक्षा स्वस्त हा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच रत्नागिरीकरांना आता गॅस पाईपलाईनने गॅसचा पुरवठा केला जाणार असून, रत्नागिरी देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे. पुढील तीन वर्षात हे काम पूर्ण होईल.

तीन वर्षात घरोघरी पाईपने गॅस पुरवठा, रत्नागिरी ठरणार देशातील पहिला जिल्हा
रत्नागिरी : येत्या तीन वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील घराघरांमध्ये पाईपद्वारे स्वयंपाक गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. एलपीजी गॅसपेक्षा स्वस्त हा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच रत्नागिरीकरांना आता गॅस पाईपलाईनने गॅसचा पुरवठा केला जाणार असून, रत्नागिरी देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे. पुढील तीन वर्षात हे काम पूर्ण होईल.
रत्नागिरी जिल्ह्यातील घरोघरी, वाहने व उद्योगांना इंधन म्हणून गॅस पुरवठा करण्यासाठी आवश्यक स्टोेरेज स्टेशन्स कंपनीतर्फे उभारली जाणार आहेत. घरांमध्ये दिला जाणारा हा गॅस एलपीजी गॅसपेक्षा स्वस्त मिळणार आहे. तसेच या गॅसच्या वापरामुळे स्वच्छ इंधन (क्लीन फ्युएल) उपलब्ध होणार असून, अन्य इंधनाप्रमाणे प्रदूषणाचा धोका उरणार नाही.
रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदरामध्ये हिरानंदानी गु्रपतर्फे फ्लोटिंग स्टोरेज रिगॅसिफिकेशन युनिटवर आधारित एलएनजी टर्मिनल सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या तीन वर्षांत जिल्ह्यातील घराघरांमध्ये पाईपद्वारे स्वयंपाक गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. देशातील केवळ महानगरांमध्येच उपलब्ध असलेली ही सुविधा येथे उपलब्ध झाल्यास रत्नागिरी हा अशी सुविधा मिळविणारा देशातील पहिला जिल्हा ठरू शकेल.
देशातील पहिल्या फ्लोटिंग स्टोरेज रिगॅसिफिकेशन युनिटवर आधारित एलएनजी टर्मिनलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या प्रकल्पाद्वारे थेट पाईप लाईनमधून दाभोळच्या रत्नागिरी पॉवर प्रोजेक्टला ३६५ दिवस गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी पॉवर प्रोजेक्ट वर्षातून केवळ ६ महिनेच कार्यरत आहे. एच एनर्जीच्या टर्मिनलमधून पाईपद्वारे गॅसचा पुरवठा झाल्यानंतर दाभोळच्या रत्नागिरी पॉवर प्रोजेक्टमधून वर्षभर वीजनिर्मिती शक्य होणार आहे.