शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पावसाचा कोकण रेल्वेला फटका; वेरवली विलवडे रेल्वेस्टेशन दरम्यान दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:41 IST

सुमारे अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरू

लांजा : पहिल्याच जोरदार पावसाचा फटका मंगळवारी कोकण रेल्वेला बसला. सायकाळी ६:३० वाजेच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावरील वेरवली - विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. यादरम्यान ये- जा करणाऱ्या रेल्वे ठिकठिकाणी थांबविण्यात आल्या. काही काळ ठप्प झालेली वाहतूक रात्री नऊ वाजेच्या सुमारास मार्गावरील माती हटविल्यानंतर सुरू झाली.मंगळवारी दुपारनंतर मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाची संततधार सुरू असल्याने या पावसाचा फटका कोकण रेल्वे मार्गाला बसला. वेरवली - विलवडे स्टेशनदरम्यान सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास मार्गावर दरड कोसळून माती रेल्वे मार्गावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दोन्ही बाजूंनी येणाऱ्या रेल्वे तातडीने जवळच्या स्थानकांवर थांबविण्यात आल्या. कोकण रेल्वे प्रशासनाला तातडीने कळविण्यात आले. त्यानंतर प्रशासनाची यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचली. कोकण रेल्वेचे रत्नागिरी विभागाचे व्यवस्थापक शैलेश बापट यांच्यासह अन्य अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले. अथक प्रयत्नांनंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही दरड बाजूला करण्यात यंत्रणेला यश आले.यादरम्यान जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस कणकवली स्थानकात थांबवण्यात आल्या, तर नेत्रावती एक्स्प्रेसला संबंधित स्थानकात थांबा देण्यात आला. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या अन्य अनेक गाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाला. सुमारे अडीच तासांनंतर वाहतूक पूर्ववत करण्यात यंत्रणेला यश आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसrailwayरेल्वेlandslidesभूस्खलनTrafficवाहतूक कोंडी